चिखली मतदारसंघातील १७ कोटी ३५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचा अर्थसंकल्पात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:20 AM2018-03-16T01:20:17+5:302018-03-16T01:20:17+5:30
चिखली : राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात चिखली मतदारसंघातील चार रस्त्यांच्या लांबीची सुधारणा करण्यासाठी १ हजार ७३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करवून घेतला असल्याचा दावा जि.प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी केला आहे.
चिखली मतदारसंघातील १७ कोटी ३५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचा अर्थसंकल्पात समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात चिखली मतदारसंघातील चार रस्त्यांच्या लांबीची सुधारणा करण्यासाठी १ हजार ७३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करवून घेतला असल्याचा दावा जि.प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी केला आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात असे म्हटले आहे, की विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत राज्याचे अंदाजपत्रक सादर केले. या अर्थसंकल्पात अनेक विकास कामे व योजनांवर खर्च होणाºया निधीची घोषणा करण्यात आली. यामध्ये चिखली तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या चार कामांचा समावेश झाला आहे.
यापैकी राज्य मार्ग २२१ ला जोडणाºया उंद्री-तोरणवाडा-धोत्रा नाईक या रस्त्याच्या लांबीची सुधारणा करण्यासाठी ४०० लाख रुपयांची तर वरवंड-उंद्री रस्ता रुंदीकरणासाठी ५३५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. दुधा-माळवंडी-केसापूर-केळवद या रस्त्याच्या लांबीची सुधारणा करण्यासाठीदेखील ४०० लाख रुपये तर धोडप-पेठ-एकलारा-अंबाशी या रस्त्याच्या सुधारणेसाठीसुद्धा ४०० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या रस्त्यांसाठी निधी मिळावा, यानुषंगाने जि.प. सभापती श्वेता महाले यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे यासंदर्भात नियमितपणे पाठपुरावा केल्याने या अर्थसंकल्पात रस्ते दुरुस्तीच्या चार कामांचा समावेश झाला असल्याची माहिती देऊन महाले यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.