चिखली तालुक्यात ११६६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

By admin | Published: May 31, 2017 12:19 AM2017-05-31T00:19:51+5:302017-05-31T00:19:51+5:30

९०.८० टक्के निकाल : ४० विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण

In Chikhli taluka, 1166 students passed first class | चिखली तालुक्यात ११६६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

चिखली तालुक्यात ११६६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर झाला. गतवर्षाच्या तुलनेत यंदा तालुक्याच्या निकालात थोडी वाढ झाली असून, टक्केवारीच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर चिखली तालुक्याच्या एकूण निकालाची टक्केवारी ९०.८० इतकी आहे.
इयत्ता १२ वी परीक्षेसाठी तालुक्यातील एकूण ३७ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतून ३ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ३ हजार ६०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्याच्या निकालाची एकूण टक्केवारी ९०.८० इतकी आहे. उत्तीर्ण एकूण ३ हजार ६०३ विद्यार्थ्यांपैकी ४० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत, तर १ हजार १६६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २०८७ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, ३१० विद्यार्थी काठावर पास झाले आहेत. तालुक्यातील महाविद्यालयांच्या शाखानिहाय व एकूण टक्केवारीनुसार श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखलीच्या कला शाखेचा ८९.७६, विज्ञान ९८.७६ व वाणिज्य ९७.३६ तर एकूण ९५.६७ टक्के, एसपीएम कला व वाणिज्य महाविद्यालय चिखलीच्या कला शाखेचा ८४.६१ व वाणिज्य शाखेचा ९५.६५ व एकूण ९३.२२ टक्के, श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चिखलीच्या विज्ञान शाखेचा ९८.८२ तर कला शाखेचा ८२.९२ व एकूण ९३.६५ टक्के, अमर कनिष्ठ महाविद्यालय अमडापूरच्या विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून, कला ७६.३६ व वाणिज्य ८७.५६ असा एकूण ८९.४३ टक्के, आदर्श विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चिखलीच्या विज्ञान शाखेचाही १०० टक्के निकाल लागला असून, कला शाखेचा ८४.८४ व एकूण ९६.१८ टक्के, विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय एकलारा विज्ञान शाखा १०० टक्के तर कला ९०.४७ व एकूण ९३.४६ टक्के, नगर परिषद उच्च माध्यमिक विद्यालय चिखली कला ७७.७७ टक्के, ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय पेठ विज्ञान ९७.८४, कला ९५.९४ व एकूण ९६.६८ टक्के, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ नवघरे कला शाखा ८४.८४ टक्के, तक्षशीला उच्च माध्यमिक विद्यालय चिखली विज्ञान ९७.९५, कला ९०.२४ व एकूण ९४.४४ टक्के, जानकीदेवी विज्ञान व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव घुबे विज्ञान ९९.४१, कला ६४.४८ एकूण ८६.०२ टक्के, श्री शिवाजी कनिष्ठ कला महाविद्यालय शेलसूर कला शाखा ९४.२८ टक्के, सिद्धेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कोलारा कला शाखा ८८.८८ टक्के, श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय किन्होळा कला शाखा ८८.२३ टक्के, श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय मेरा बु. कला शाखा ९८.६१ टक्के, स्व.भास्करराव शिंगणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पळसखेड कला शाखा ७४.०२ टक्के, उमाकांत कनिष्ठ कला महाविद्यालय सातगांव भुसारी ९५ टक्के, नर्मदा उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय मंगरूळ (ई.) विज्ञान ९७.६१, कला ८६.१३ तर एकूण ९३.३० टक्के, श्री शिवशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भरोसा विज्ञान १००, कला ९२.४५ व एकूण ९६.५८ टक्के, सर सैय्यद अहेमद खान कनिष्ठ उर्दू महाविद्यालय अमडापूर विज्ञान १००, कला ९७.०५ व एकूण ९९.०१ टक्के, महाराणा प्रताप कनिष्ठ महाविद्यालय बेराळा विज्ञान ९७.४३, विज्ञान ९६.६६ व एकूण ९७.०२ टक्के, राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चांधई ९९.१३ टक्के, स्व.भास्कररावजी शिंगणे माध्यमिक व कनिष्ठ कला महाविद्यालय अमोना ८२.९७ टक्के, शहाजी राजे माध्यमिक व कनिष्ठ कला महाविद्यालय उंद्री ९३.८१ टक्के, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मंगरूळ नवघरे विज्ञान शाखा ९२.२२, कला ४७.७२, वाणिज्य ५५.७६ व एकूण ७४.०६ टक्के, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा किन्ही नाईक विज्ञान ९५.३४, कला ९७.२९ व एकूण ९६.२५ टक्के, सानिया उर्दू कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चिखली १०० टक्के, श्री शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय नायगाव बु. ९८.१४ टक्के, स्व.भास्कररावजी शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय इसरूळ विज्ञान १००, कला ९६ व एकूण ९८.२६ टक्के, श्री गुरूदेव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय धोडप ९७.७२ टक्के, इब्राहीम कनिष्ठ कला महाविद्यालय किन्होळा ६६.६६, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय चिखली एचएससी व्होकेशनल ७५ टक्के, श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चिखली एचएससी व्होकेशनल ७५ टक्के, अमर कनिष्ठ महाविद्यालय अमडापूर एचएससी व्होकेशनल ८८.०५ टक्के, आदर्श कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चिखली एचएससी व्होकेशनल ७७.०४ टक्के, राधाबाई खेडेकर एमसीव्हीसी कनिष्ठ महाविद्यालय चिखली एचएससी व्होकेशनल ६४ टक्के, सानिया कनिष्ठ महाविद्यालय चिखली एचएससी व्होकेशनल ६६.६६ टक्के, असे एकूण तालुक्यातील ३७ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचा निकाल ९०.८० टक्के इतका लागला आहे.

विज्ञान शाखेचे १०० नंबरी ‘सक्सेस’
यंदा आॅनलाइन निकालात प्रथमच सर्व महाविद्यालयांचे शाखानिहाय निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण निकालाची टक्केवारी गृहित धरल्यास तालुक्यातील एकाही महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागलेला नाही; परंतु शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने बाजी मारली असून, विज्ञान शाखांच्या एकूण महाविद्यालयांपैकी ७ महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय इसरूळ, सानिया उर्दू ज्यू.कॉलेज चिखली, सर सय्यद अहमद खान उर्दू ज्यू.कॉलेज अमडापूर, श्री शिवशंकर माध्य.व उच्च माध्य.विद्यालय भरोसा, विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय एकलारा, आदर्श विज्ञान क.म.वि.चिखली व अमर क.म.वि.अमडापूर या ७ महाविद्यालयांचा समावेश आहे.

Web Title: In Chikhli taluka, 1166 students passed first class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.