‘महा-ऑनलाइन’मध्ये चिखली तहसील जिल्हय़ात आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:31 AM2017-08-05T00:31:43+5:302017-08-05T00:33:11+5:30
चिखली : महा-ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केवळ दोन महिन्यांतच विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासह इतर बाबींसाठी आवश्यक दाखल्यांसह नागरिकांना लागणारे विविध १0 हजार दाखले व प्रमाणपत्न वितरित करत चिखली तहसील कार्यालयाने या सुविधेत जिल्हय़ात आघाडी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : महा-ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केवळ दोन महिन्यांतच विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासह इतर बाबींसाठी आवश्यक दाखल्यांसह नागरिकांना लागणारे विविध १0 हजार दाखले व प्रमाणपत्न वितरित करत चिखली तहसील कार्यालयाने या सुविधेत जिल्हय़ात आघाडी घेतली आहे.
नव्या शैक्षणकि वर्षाला सुरुवात होताना उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्न, सर्वसाधारण शपथपत्न, जातीचा दाखला, शेतकरी प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असे विविध दाखले व प्रमाणपत्न मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावाधाव सुरू असते. त्यातून शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ऑनलाइन व्यवस्था करीत हे दाखले मिळवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. दरम्यान येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र बंद झाल्यानंतर केवळ ‘महा ई-सेवा’ आणि ‘आपले सरकार’ या बेव पोर्टलवर जाऊन संबंधित अर्ज भरून दाखले व प्रमाणपत्र मिळविण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानुषंगाने सर्व विद्यार्थी व पालकांची गरज लक्षात घेता, तसेच शाळा-महाविद्यालय प्रवेश या दाखल्यांमुळे थांबू नये, यासाठी तहसीलदार मनीष गायकवाड व त्यांच्या चमूने जातीने तालुक्यातील सर्व महा ई-सेवा केंद्रांना भेटी देऊन उचित मार्गदर्शन करीत विविध दाखले व प्रमाणपत्रांसाठी आलेल्या अर्जांवर जलदगतीने कारवाई केल्याने तालुक्यात दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १0 हजारांच्यावर विविध दाखले व प्रमाणत्रांचे वितरण झाले आहे.
चिखली तालुक्यात आजरोजी एकूण २८ महा ई-सेवा केंद्रांद्वारे ही सुविधा उपलब्ध आहे. शिवाय सामान्य जनतेला ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलवरूनदेखील नोंदणी करून स्वत: दाखले मिळविता येतात. ऑनलाइन पद्धतीने अर्जदाराला प्रमाणपत्न व दाखलानिहाय शुल्क भरावे लागते. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर किती दिवसात दाखला वा प्रमाणपत्न मिळेल, याची मुदत आधीच निश्चित करण्यात आली आहे. दाखला वा प्रमाणपत्रनिहाय ही मुदत वेगवेगळी आहे. याबाबत जनतेला कोणतीही तक्रार वा अडचण उद्भवल्यास नागरिकांनी नायब तहसीलदार आर.एस. कानडजे, सेतू लिपिक नीरज काकडे, रूपेश सोनवाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार मनीष गायकवाड यांनी केले आहे.
जून व जुलै महिन्यात १0 हजार ३0 दाखले वितरित
तहसीलदार मनीष गायकवाड यांच्या नियोजनाने चिखली तहसील कार्यालयामार्फत जून व जुलै महिन्यात ऑनलाइन पद्धतीने १0 हजार ३0 अर्ज जलदगतीने वितरित केले आहेत. यामध्ये नॉन क्रिमिलेअर १६७२, उत्पन्न प्रमाणपत्र ४८४५, वय-राष्ट्रीयत्व आणि अधिवास १८६३, जातीचे दाखले १३१३, शेतकरी प्रमाणपत्र ३0२, भूमिहीन प्रमाणपत्र ८, तसेच o्रावण बाळ सेवा राज्य नवृत्ती वेतन योजनेचे ३ प्रमाणपत्र, असे एकूण १0 हजार ३0 प्रमाणपत्रांचे वितरण करून चिखली तहसील कार्यालयाने ‘ऑनलाइन’ पद्धतीने अर्ज वितरण करण्यात आघाडी मिळविली आहे.