चिखलीत देशी कट्टा जप्त

By admin | Published: September 25, 2015 12:11 AM2015-09-25T00:11:32+5:302015-09-25T00:11:32+5:30

आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखा व चिखली पोलिसांची संयुक्त कारवाई.

Chikhliat native cloth seized | चिखलीत देशी कट्टा जप्त

चिखलीत देशी कट्टा जप्त

Next

चिखली (जि. बुलडाणा) : शहरात देशी कट्टा विक्रीसाठी येत असल्याच्या गुप्त माहितीवरून वाहतूक शाखेचे कर्मचारी पाळत ठेवून होते. गोपनीय माहिती मिळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व चिखली पोलिसांनी बसस्थानकावर सापळा रचला. धुळे-पुसद या बसमधून आलेल्या आरोपीला ओळखून त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे एक देशी कट्टा, दोन जिवंत काडतूस आणि मॅगझीन आढळून आले. सदर कारवाई २४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली. गत अनेक महिन्यांपासून चिखली शहरात देशी कट्टा मिळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने चिखली पोलिसांनी अधिक माहितीसाठी खबर्‍यांना कामाला लावले होते. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेनेदेखील आपली यंत्रणा कामाला लावली होती. दोघांना मिळालेल्या संयुक्त माहितीवरून २४ सप्टेंबर रोजी गोपालसिंग बसमतसिंग टाक (५0 रा. शेंदला) हा धुळे-पुसद बस क्रमांक एमएच ४0 वाय ५४७९ ने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चिखली बसस्थानकावर उतरला. यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता, त्याकडे एक देशी कट्टा, दोन जिवंत काडतूस, मॅगझीन असे साहित्य जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध आर्म अँक्ट ३/२५ मु.पो.का.३३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हेचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश लोधी व पथक तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे गजानन जाधव, संदीप सोनुने आदी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Chikhliat native cloth seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.