चिखलीत ‘पद्मावत’ प्रदर्शित होणार नाही; सर्वपक्षीय पदाधिकारी व चित्रपटगृह चालकांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:37 AM2018-01-22T00:37:16+5:302018-01-22T00:46:45+5:30
चिखली (बुलडाणा): दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा येत्या २५ जानेवारी रोजी रिलीज होणारा ‘पद्मावत’ हा चित्नपट चिखली तालुक्यात प्रदर्शित न करण्याबाबतच निर्णय २१ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वपक्षीय, सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांचा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस उपस्थित शहरातील चित्रपटगृह चालकांनी देखील हा चित्रपट आपण दाखविणार नसल्याचे यावेळी जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

‘पद्मावत’ या चित्रपटावरून राजपूत समाजाच्या विविध संघटना, इतिहासकार यांच्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आहेत. या तीव्र भावना देशभरातील आंदोलनांमधून व्यक्त देखील झाल्या आहेत. या भावनांचा आदर करीत चिखलीतील कोणत्याही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय या बैठकीत एकमुखाने घेण्यासह जिल्हय़ातील कोणत्याही चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येवू नये, अशी भूमिका यावेळी घेतल्या गेली. स्थानिक राणा कॉम्प्लेक्स मध्ये पार पडलेल्या या बैठकीला सुभाष राजपूत, डॉ.प्रतापसिंग राजपूत, डॉ.सत्येंद्र भुसारी, सिध्दुसिंग राजपूत, अशोक सुरडकर, समाधान गाडेकर, गजाननसिंह सोळंकी, विनायक सरनाईक, कुणाल बोंद्रे, अनिस शेख, शिवाजी देशमुख, जयदेव शेळके, प्रल्हाद इंगळे, भरत जोगदंडे, अनंत जोशी, तानाजी चिकने, सुनिल कासारे, धनंजय चौधरी, अनुप अग्रवाल, गोलाणी, सिध्दार्थ पैठणे, दिपक सुरडकर, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.