मुलाने रचले अपहरणाचे बनावट नाट्य!

By admin | Published: June 6, 2017 12:03 AM2017-06-06T00:03:07+5:302017-06-06T00:03:07+5:30

वडील रागावण्याची भीती

Child stabbed the theft of drama! | मुलाने रचले अपहरणाचे बनावट नाट्य!

मुलाने रचले अपहरणाचे बनावट नाट्य!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : वडील रागावतील, या भीतीमुळे एका ११ वर्षीय मुलाने अपहरण झाल्याचे बनावट नाट्य रचल्याची घटना ५ जून रोजी मोताळा येथे उघडकीस आली. ४ जून रोजी मुलाच्या अपहरणाच्या घटनेमुळे मोताळा तालुक्यात खळबळ उडाली होती.
मोताळा वार्ड नं.८ येथील रहिवासी शेख खालीद शेख हारुण यांनी ४ जून रोजी पोलीस स्टेशनला माहिती दिली की, त्यांचा मुलगा शेख वाजीद शेख खालीद (वय ११) याने संध्याकाळी ४.३० वाजताच्या फोन करून त्याचे अपहरण झाल्याचे सांगितले. शेख वाजिदला चार लोकांनी उचलून नेऊन स्टेट बँक मोताळा मागील नदीमध्ये हात बांधून ठेवले होते. मी कसातरी हाताची दोरी तोडून आलो, असे मुलाने सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. याबाबत ५ जून रोजी सदर घडलेल्या घटनेबाबत चौकशीदरम्यान शेख वाजीद शेख खालीद यास विचारपूस केली असता त्याने स्वत:च अपहरणाचे बनावट नाट्य रचल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, ‘एकदा माझ्याकडून माझ्या वडिलांच्या मोबाइलचे मेमरी कार्ड तुटले होते. माझे वडील माझ्यावर त्यावेळी रागावले होते. काल माझ्या वडिलांचे मोबाइलचे दुसरे मेमरी कार्ड गाणे भरण्याकरिता घेऊन गेलो असता, ते मेमरी कार्ड पुन्हा तुटले, वडील रागावतील, या भीतीने मी घरी गेलो नाही. स्टेट बँक मोताळा मागील नदीमध्ये बसून राहिलो, संध्याकाळी ४.३० वाजता घरी जावून वडिलांना खोटे सांगितले की, मला चार लोकांनी उचलून नेऊन नदीमध्ये हात बांधून ठेवले व मला मुंबईला पळवून नेतो, असे खोटे सांगितले, असे तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे शेख वाजीद याने वडिलांच्या भीतीमुळे अपहरण झाल्याचे बनावट उघडकीस आले.
सदर घटनेबाबत ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गजानन वाघ यांनी चौकशी करून अपहरणाचा बनावट प्रकार उघडकीस आणला.

Web Title: Child stabbed the theft of drama!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.