शेतात काम करताना बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 11:50 AM2021-07-28T11:50:33+5:302021-07-28T11:55:33+5:30

A child working in a field died of snake bite : दुपारच्या वेळी शेतात काम करताना त्याच्या हाताला अचानक एका सापाने चावा घेतला.

A child working in a field died of snake bite | शेतात काम करताना बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

शेतात काम करताना बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माेताळा : शेतात काम करीत असलेल्या मुलाला विषारी सापाने दंश केल्याची घटना २६ जुलै राेजी तराेडा शिवारात घडली़  या मुलाचा उपचारादरम्यान बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला़.  जीवन मेरसिंघ भेलके असे मृतक मुलाचे नाव आहे़. 
  मोताळा तालुक्यातील ग्राम तरोडा येथील १५ वर्षीय जीवन मेरसिंघ भेलके हा मुलगा सोमवारी शेतात कामासाठी गेला होता़.  दुपारच्या वेळी शेतात काम करताना त्याच्या हाताला अचानक एका सापाने चावा घेतला. ही बाब लक्षात येताच जीवनच्या नातेवाईकांनी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले़ मात्र चावा घेणारा साप अति विषारी असल्याने उपचार सुरु असताना जीवनचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

आणखी एका बालिकेला सर्पदंश 
तराेडा येथीलच १६ वर्षीय बालिका दीक्षा शेरसिंग रबडे हिला ही साेमवारीच विषारी सापाने दंश केला़ तिच्यावर बुलडाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़  काही दिवसांपूर्वी सूचित मयाराम जाधव (१७) हा शेतात काम करीत असताना त्याला सर्पदंश झाला हाेता़ त्याच्यावरही उपचार सुरू आहेत़ गत काही दिवसांपासून सर्पदंशाच्या घटनेत वाढ झाली आहे़.
 

Web Title: A child working in a field died of snake bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.