बालकांच्या प्रश्नांनी केले अंतर्मुख!
By admin | Published: March 14, 2016 01:46 AM2016-03-14T01:46:49+5:302016-03-14T01:46:49+5:30
बालकुमार साहित्य संमेलनाच्या दुस-या दिवशी झालेल्या अभिरूप न्यायालयात पालकांसह राजकीय पक्ष, शिक्षणसंस्था आरोपीच्या पिंज-यात.
बुलडाणा : देशात लोकशाही असताना घरात मात्र पालकशाही का? ऋतू बदलाप्रमाणे शाळांच्या वेळा का बदलत नाहीत, दप्तराचे ओझे कमी करणार तरी कधी, आमचं करिअर आम्हाला ठरवू द्या, हे करू नको, ते करू नको, असा ससेमिरा संपणार आहे का, राजकारण वाईट, त्यात जाऊ नको, मग चर्चा कशाला करता? बालकांच्या अशा एक ना अनेक प्रश्नांनी अभिरूप न्यायालय दणाणून गेले व या प्रश्नांची उत्तरे देताना पालक, शिक्षण संस्था व राजकीय क्षेत्राच्या प्रतिनिधींना दरदरून घाम फुटला.
स्थानिक गर्दे सभागृहात आयोजित राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या दुसर्या दिवशी दुसर्या सत्रात अभिरूप न्यायालय भरले होते. ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे न्यायाधीश असलेल्या या न्यायालयात राजकीय क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी म्हणून अकोल्याच्या प्रभात किड्सचे संचालक डॉ.गजानन नारे, पालकांचे प्रतिनिधी म्हणून प्रख्यात साहित्यिक सीमा रोठे-शेटे हे आरोपींच्या पिंजर्यात होते. या न्यायालयात बालकांवर पालक, समाज, शिक्षणसंस्था व कुटुंब यांच्या अपेक्षांचे असलेले ओझे या वतरुळाभोवती प्रश्नांची गुंफण बालकांनी केली. ऋतू बदलतो, मग शाळांची वेळ का बदलल्या जात नाही? राजकारण हे करिअर होऊ शकते का? नेत्यांकडे एवढा पैसा कोठून येतो, पालक आमचा विचार कधी करणार, अशा अनेक प्रश्नांनी न्यायालयासह संपूर्ण गर्दे सभागृह अंतर्मुख झाले.
या न्यायालयात इंद्रायणी शेळके, अभिषेक देशमुख, यशङ्म्री जवरे, अर्थ साळवे, ङ्म्रेया गायकवाड, रूचा टाकळकर, मैत्री लांजेवार या बालकांनी प्रश्न उपस्थित केले. सरकारी वकील म्हणून नरेंद्र लांजेवार यांनी बालकांची बाजू चांगलीच लावून धरली. न्यायालय सुरू होण्यापूर्वी आरोपींचा परिचय पत्रकार राजेश शेगोकार यांनी तर आभार पत्रकार अरूण जैन यांनी मानले.