मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:33 AM2021-03-21T04:33:34+5:302021-03-21T04:33:34+5:30

मिरची येते परराज्यातून जिल्ह्यात मध्य प्रदेश, आंध्र पदेशातून लाल मिरची विक्रीसाठी येते. जिल्ह्यात काही शेतकरी मिरचीची लागवड करीत असले ...

Chilies, spices hit by inflation | मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

Next

मिरची येते परराज्यातून

जिल्ह्यात मध्य प्रदेश, आंध्र पदेशातून लाल मिरची विक्रीसाठी येते. जिल्ह्यात काही शेतकरी मिरचीची लागवड करीत असले तरी हिरव्या मिरच्या विक्रीलाच पसंती दिली जाते. क्वचित शेतकरी लाल मिरच्या विक्री करतात. त्यामुळे बाहेरील राज्यांतूनच लाल मिरची आयात करावी लागते. जिल्ह्यात गावरान मिरचीला मागणी असती तरी कमी किमतीच्या विविध मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत.

मिरचीचे दर (प्रति किलो)

गावरान - २००

बेडगी - १५०

तेजा - १५०

लवंगी - १८०

मसाल्याचे दर (प्रति किलो)

धने - १२०

जिरे - १६०

तीळ - १२०

खसखस - ११००

खोबरे - २००

मेथी - ८०

हळद - १२०

अन्य मसाले (प्रति दहा ग्रॅम)

लवंग - १०

बदामफुल - १०

बडीशेप - ३

नाकेश्वर - २०

धोंडफूल - ७

वेलदोडे - ४०

गृहिणी म्हणतात...

मसाला, वेगवेगळ्या चटण्या दरवर्षी उन्हाळ्यातच करून ठेवत असतो. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे अनेक वस्तू वेळेवर उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे यंदा अगोदरच सर्व साहित्य खरेदी केले आहे. मसाल्याच्या दरामध्ये किंचितशी वाढ झाल्याचे दिसून येते.

- कोमल पवार, गृहिणी.

दरवर्षी मसाला, चटणी, लोणची घरीच करतो. गतवर्षीपेक्षा मसाल्याच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे. आता उन्हाळा सुरू झाला असून, मसाला, चटण्या बनविण्यास सुरुवात झालेली आहे.

- वनिता गावंडे, गृहिणी.

Web Title: Chilies, spices hit by inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.