बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिंचपूर ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:10 PM2018-01-05T13:10:45+5:302018-01-05T13:11:53+5:30
बुलडाणा : खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील पाणलोट समितीमार्फत निकृष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी बाबुलाल लक्ष्मण राठोड व सैय्यद जमीर सैय्यद मलीक यांनी ३ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.
बुलडाणा : खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील पाणलोट समितीमार्फत निकृष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी बाबुलाल लक्ष्मण राठोड व सैय्यद जमीर सैय्यद मलीक यांनी ३ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, चिंचपूर येथे सावता माळी समाज विकास, शैक्षणिक व बहुउद्देशिय मंडळ बुलडाणा व पाणलोट समितीचे अध्यक्ष व सचिव रा. चिंचपूर यांनी समितीमार्फत राबविण्यात आलेल्या कामात प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे या कामांची चौकशी करून कारवाई करावी, वसुंधरा एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास समिती, चिंचपूर ही समिती बोगस व बनाव दस्तऐवज तयार करून धर्मदाय आयुक्त, बुलडाणा येथे नोंदणी केलेली रद्द करावी, पाणलोट समिती, चिंचपूर या समितीचे अध्यक्ष, सचिव व पाणलोट विकास पथक यांच्यावर ४२०चे गुन्हे दाखल करावे यासह इतर मागण्यांसाठी यापूर्वी २२ डिसेंबर २०१७ रोजी निवेदने दिले आहे. मात्र या निवेदनाची कोणतीच दखल न घेतल्यामुळे ३ जानेवारी पासून उपोषण सुरू केल्याचे नमूद केले आहे. यावेळी उपोषण मंडपाला राजू नाईक, गोवर्धन राठोड, रामदास जाधव, मोहन भुसांडे, मोहन राठोड, रमेश गवारगुरू आदींनी भेट देवून पाठींबा दिला आहे.