विद्यार्थ्यांसोबत सिने अभिनेत्यांनी धरला फेर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 04:13 PM2019-02-01T16:13:40+5:302019-02-01T16:14:15+5:30
खामगाव : स्थानिक लक्ष्मीनारायण ग्रुपच्यावतीने आयोजित वार्षिकोत्सवात बुधवारी चक्क सिने अभिनेत्यांनी विद्यार्थ्यांसोबत फेर धरला आणि विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक लक्ष्मीनारायण ग्रुपच्यावतीने आयोजित वार्षिकोत्सवात बुधवारी चक्क सिने अभिनेत्यांनी विद्यार्थ्यांसोबत फेर धरला आणि विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाला भरभरून दाद दिली. सिने अभिनेते अशोक शिंदे आणि नायिका विणा जगताप यांच्या खास उपस्थितीतील हा सोहळा अनेकांसाठी डोळ्याचे पारण फेडणाराच ठरला.
निमित्त होते ते, येथील लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल मॉडेल स्कूल आणि कॉलेजेसच्या दोन दिवसीय भरारी वार्षिक महोत्सवाचे. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीनारायण ग्रुपचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान होते. तर विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेते अशोक शिंदे आणि नायिका विणा जगताप यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द सूत्रसंचालक अरविंद शिंगाडे, लक्ष्मीनारायण ग्रुपच्या संचालिका सौ. राजकुमारी चौहान यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी विणा जगताप, तेजेंद्रसिंह चौहान यांची समायोचित भाषणेही झालीत. मंगळवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात शिक्षण संस्थेतील चिमुकल्यासंह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींचे सादरीकरण केले. संचालन पूजा काळे आणि आरजे श्री यांनी केले. आभार प्राचार्य भटकर यांनी मानले. या वार्षिक महोत्सवात शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. त्यामुळे कोल्हटकर सभागृह खचाखच भरले होते.
बैलजोडीची प्रतिकृती भेट!
वार्षिक महोत्सवाला उपस्थित असलेल्या मान्यवरांना आणि विशेष अतिथींना बैलजोडीची प्रतिकृती भेट देण्यात आली. शेतकºयांच्या समस्या आपल्या कलाअविष्कारातून मांडण्याची अपेक्षाही यावेळी लक्ष्मीनारायण ग्रुपचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी यावेळी व्यक्त केली.