टिप्परच्या धडकेत सुनगावच्या सीआयएसएफच्या जवानाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 10:07 PM2022-02-09T22:07:09+5:302022-02-09T22:07:16+5:30

कैलास कापरे हे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावचे रहिवासी आहेत.

CISF jawan of Sungaon killed in tipper accident | टिप्परच्या धडकेत सुनगावच्या सीआयएसएफच्या जवानाचा मृत्यू

टिप्परच्या धडकेत सुनगावच्या सीआयएसएफच्या जवानाचा मृत्यू

Next

सुनगाव (बुलडाणा) : चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या सीआयएसएफ जवानाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर-नागपूर रोडवरील उर्जानगरकडे जाणाºया रस्त्यावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कैलास नारायण कापरे असे मृत जवानाचे नाव आहे.

कैलास कापरे हे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावचे रहिवासी आहेत. मागील काही वर्षांपासून ते औष्णिक विद्युत केंद्रात सीआयएसएफ जवान म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी ते आपल्या दुचाकीने लखमापुरकडे जात होते. दरम्यान त्यांच्या मागून भरधाव येणाºया टिप्पर क्रमांक एमएच ३४ एम ४१६२ ने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: CISF jawan of Sungaon killed in tipper accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.