जागृती फूड्सकडून नागरिकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:59+5:302021-07-14T04:39:59+5:30

बुलडाणा : जागृती ॲग्रो फूड्स इंडिया प्रा.लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणुकीवरील परताव्याचे पैसे ...

Citizens cheated by Awareness Foods | जागृती फूड्सकडून नागरिकांची फसवणूक

जागृती फूड्सकडून नागरिकांची फसवणूक

googlenewsNext

बुलडाणा : जागृती ॲग्रो फूड्स इंडिया प्रा.लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणुकीवरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे, अशी तकार १६ सप्टेंबर २०१५ रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे प्यारेलाल जयस्वाल, विष्णूवाडी, बुलडाणा यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी राज गणपत गायकवाड व इतर दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राज गणपत गायकवाड व इतर दहा आरोपींनी अन्य जनतेचीदेखील अशा प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशाप्रकारची फसवणूक झालेले आणखी जिल्ह्यातील काही व्यक्ती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे संपर्क साधावा किंवा स्वत: आपला जबाब नोंदविणेकामी आपल्याजवळ असलेल्या मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, भारत शाळेसमोर, पोलीस स्टेशन, बुलडाणा शहरचे आवार, बुलडाणा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केले आहे.

Web Title: Citizens cheated by Awareness Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.