संपामुळे नागरिकांची कोंडी
By admin | Published: March 24, 2015 01:08 AM2015-03-24T01:08:15+5:302015-03-24T01:08:15+5:30
डाक सेवा झाली होती विस्कळीत; बाराव्या दिवसानंतर चर्चेच्या आश्वासनाने आंदोलन मागे.
पातुर्डा (जि. बुलडाणा): अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्यावतीने १0 मार्चपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप अखेर शनिवारी १२ व्या दिवशी चर्चेच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला; मात्र एकूणच या संपामुळे ग्रामीण भागात डाक सेवा ठप्प झाली होती. ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाविष्ट करा, त्यांना सर्व विभागीय सेवा द्याव्यात, ग्रामीण डाक सेवकांच्या सेवा-शर्ती संरचनासंबंधी न्यायाधीश समितीचे गठण करा, डाक विभागाच्या कापोर्रेशन प्रस् तावाला टास्क फोर्सला रोखा आदी मागण्यांसाठी हा बेमुदत संप संघटनेने १0 मार्चपासून पुकारला होता. देशभर संपाला प्रतिसाद मिळाला. २0 मार्चपयर्ंत या संपाबाबत कोणताही यशस्वी तोडगा न निघाल्याने हा बेमुदत संप सुरूच होता. या बेमुदत संपामुळे ग्रामीण भागातील टपाल वितरण सेवा संपूर्णत: कोलमडली होती. अखेर आंदोलन मागे घेतल्यास चर्चेची तयारी दाखविण्यात आल्याने २१ मार्च रोजी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा पूर्वपदावर येणार आहे. ग्रामीण भागात डाक विभागाशिवाय दुसरी बँक किंवा इतर सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील सर्व व्यवहार डाक विभागावरच अवलंबून असतात, मात्र डाक सेवकांनी आपल्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांबाबत संपाचे आंदोलन पुकारल्याने सर्व व्यवहार विस्कळीत झाले होते; मात्र १२ व्या दिवसाअखेर का होईना, डाक सेवकांच्या मागण्यांबाबत वरिष्ठांनी चर्चा करून मागण्या निकाली काढण्याबाबत आश्वासन दिल्याने हा संप मागे घेण्यात आला. आंदोलनाला आलेले यश पाहता पातुर्डा व परिसरातील ग्रामीण डाक सेवकांकडून मागण्या पूर्ण होत असल्याचे पाहून ग्रामस्थांमध्ये आनंदो त्सवसुद्धा साजरा करण्यात आला.