पालिकेच्या चुकीचा सर्व्हेमुळे नागरिक बेघर; शेगावात प्रहारचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:46 PM2018-07-06T15:46:46+5:302018-07-06T15:48:24+5:30

शेगाव : शेगाव विकास आराखडा अंतर्गत म्हाडाची कालनी बांधण्यात आली. मातंगपुरी उठवुन त्यांना म्हाडामध्ये हक्काने जगण्यासाठी मालकीची घरे देण्यात आली परंतु ही घरे देण्यासाठी झालेला सर्व्हे चुकीचा असल्याचा आरोप करीत प्रहारच्या वतिने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Citizens homeless due to wrong conduct of the survey in shegaon | पालिकेच्या चुकीचा सर्व्हेमुळे नागरिक बेघर; शेगावात प्रहारचे आंदोलन 

पालिकेच्या चुकीचा सर्व्हेमुळे नागरिक बेघर; शेगावात प्रहारचे आंदोलन 

googlenewsNext
ठळक मुद्देमातंगपुरीचा सर्व्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित नागरिक व प्रहारच्या वतिने ठिय्या आंदोलन केले आहे. सर्व्हे मध्ये मातंगपुरी मधील अनेक रहिवाशांची नाव नसल्यामुळे त्यांना म्हाडाच्या कॉलनीत घरे देण्यात आली नाहीत.


शेगाव : शेगाव विकास आराखडा अंतर्गत म्हाडाची कालनी बांधण्यात आली. मातंगपुरी उठवुन त्यांना म्हाडामध्ये हक्काने जगण्यासाठी मालकीची घरे देण्यात आली परंतु ही घरे देण्यासाठी झालेला सर्व्हे चुकीचा असल्याचा आरोप करीत प्रहारच्या वतिने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन सर्व्हे करणाºया दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्यासाठी प्रहारचे शहराध्यक्ष निलेश घोंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.
म्हाडाच्या कॉलनीत घरे देण्यासाठी शासनाच्या अधिकारी वर्गाने मातंगपुरीमधील घरांचा सर्व्हे केला, परंतु हा सर्व्हे करताना मोठ्या प्रमाणात भेदभाव करण्यात आला.  तर सर्व्हे मध्ये मातंगपुरी मधील अनेक रहिवाशांची नाव नसल्यामुळे त्यांना म्हाडाच्या कॉलनीत घरे देण्यात आली नाहीत. त्यामुळे ते बेघर झाले आहेत. अशातच पावसाळ्याला सुरूवात झाल्याने घरे नसलेल्या नागरीकांनी म्हाडाच्या खाली असलेल्या घरात आश्रय घेतला. तर न.प च्या कर्मचारी वगार्ने त्यांना तेथुन हकालुन देण्यात आले. त्यामुळे हे लोक बेघर झाले असून घराच्या लाभापासुन सर्व्हे मध्ये डावलणाऱ्या  मातंगपुरीचा सर्व्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित नागरिक व प्रहारच्या वतिने ठिय्या आंदोलन केले आहे. यामध्ये शहराध्यक्ष निलेश घोंगे यांच्यासह क्रिष्णा सावळे, संजय कांबळे, अमर तायडे, क्रिष्णा सोनोने, एकनाथ तायडे, अजय तायडे, रोहित तायडे, मनोज वानखडे, सागर सुरळकर, वेणुबाई सोनोने, सोनम गवई, माधुरी तायडे, किरण तायडे, दिपाली सोनोने, सिंधु तायडे, विमल खंडारे, उषा तायडे, कामिना तायडे, शारदा सोनोने, प्रविण तायडे, महेश तायडे, राजेश तायडे, अमोल सावळे, शिवा तायडे, मोहन सावळे, निर्मला खंडारे, गजानन सोनोने, अजय चंदनशीव, राजेश काजळे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Citizens homeless due to wrong conduct of the survey in shegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.