४५ वर्षे वयावरील नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:35 AM2021-04-02T04:35:58+5:302021-04-02T04:35:58+5:30
लोणार : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी अधिकाधिक लोकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने ४५ वर्षे वयावरील लोकांच्या ...
लोणार : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी अधिकाधिक लोकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने ४५ वर्षे वयावरील लोकांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. या मोहिमेला १ एप्रिलपासून लोणार येथे सुरुवात झाली.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून कोणतीही सहव्याधी नसलेल्या आणि वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोनाप्रतिबंधक लस घेता येणार आहे. याआधी सहव्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील लोकांना लस घेण्याची परवानगी होती.
बाॅक्स
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचे प्रमाण ८० टक्के आहे. या पार्श्वभूमीवर ४५ वर्षे वयावरील लोकांचे लसीकरण? करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानंतर ४५ हून कमी वय असलेल्या लोकांच्या लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बाॅक्स
कसे करणार लसीकरण?
cowin.gov.in हे संकेतस्थळ किंवा को-विन ॲपवर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतरच लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण इत्यादीची माहिती मिळेल. लसीकरण केंद्रावर जाताना पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड वा बँकेचे पासबुक यापैकी कोणतेही एक दस्तऐवज घेऊन जावे. त्यावरून तुमची जन्मतारीख समजण्यास यंत्रणांना सोपे होईल.
बाॅक्स
कोण असेल पात्र?
ज्यांचे जन्मसाल १९७७ असेल त्यांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार नाही. ३१ डिसेंबर १९७६ पर्यंत ज्यांची जन्मतारीख असेल तेच लसीकरणासाठी पात्र? ठरतील.
बाॅक्स
राज्याला २६ लाख कोविशिल्ड डोसचा साठा
राज्यात आजपासून ४५ वर्षांहून अधिक व्यक्तींना लसीकरणाचा टप्पा सुरू होणार असून, केंद्र शासनाकडून राज्याला २६.७७ लाख कोविशिल्डचे डोस मिळाले आहेत.