नेटवर्कअभावी ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:52+5:302021-03-29T04:20:52+5:30
दुसरबीड सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा परिसरातील सर्वच मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना नेटवर्क नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा ...
दुसरबीड सिंदखेड राजा
तालुक्यातील मलकापूर पांग्रा परिसरातील सर्वच मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना नेटवर्क नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मोबाईलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे.. इंटरनेट ४-जी सेवा नेटवर्क सेवा बंद पडणे मिळणे. शेजारी-शेजारी फोन असतानादेखील फोन न लागणे अशा विविध कारणांमुळे सर्वच मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना सध्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गत महिनाभरापासून सर्वच कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे.
चौकट
वीज बिल थकल्याने टॉवरचे कनेक्शन कापले
मलकापूर पांग्रा येथील मोबाईल टॉवरचे साडेबारा लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरणने टॉवरचे वीज कनेक्शन कट केले आहे. परिणामी, वीज पुरवठा नसल्याने नेटवर्क गायब होण्यावर झाला आहे. एकीकडे रिचार्ज दर वाढत असताना दुसरीकडे नेटवर्क मिळत नसल्याने पैसे देऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व कंपन्यांचे प्लॅन हे मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक, असल्यामुळे दिवस तर संपत आहे.