अघाेषित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:20+5:302021-05-21T04:36:20+5:30
मेहकर : कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीकडून शहरांमध्ये अवेळी भारनियमन केले जाते. अगोदरच उन्हाळा, त्यात संचारबंदी, ...
मेहकर : कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीकडून शहरांमध्ये अवेळी भारनियमन केले जाते. अगोदरच उन्हाळा, त्यात संचारबंदी, अशा परिस्थितीत होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बऱ्याचवेळा मध्यरात्रीनंतर खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे. मे महिना असल्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक घरीच थांबणे पसंत करतात. टीव्हीवरील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत नागरिक वेळ घालवत आहेत. असे असताना महामहावितरण कंपनीकडून मागील पंधरा ते वीस दिवसांपासून शहरात अवेळी वीज पुरवठा खंडित केला जात आहे.
वास्तविक पाहता महावितरण कंपनीकडून भारनियमनापूर्वी वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक असते. मात्र, कुठलेच कारण नसताना दररोज दोन ते तीन तास वीज पुरवठा खंडित करून अवेळी भारनियमन केले जात आहे. अनेकवेळा मध्यरात्रीनंतर खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील तीन ते चार दिवसांत वातावरणात थोडा तरी बदल जाणवला किंवा पाण्याचे दोन-चार थेंब जरी पडले, तरी वीज पुरवठा बंद केला जात आहे. महावितरण कंपनीने उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा तसेच कडक निर्बंधांचा विचार करून भारनियमन बंद करावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.