नगर अभियंत्यांना दिली अनधिकृत बांधकामाचे शिरोमणी पदवी; खामगाव पालिकेत अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:22 PM2018-07-27T18:22:47+5:302018-07-27T18:24:22+5:30
खामगाव: शहरातील अनधिकृत बांधकामांना अभय देणाºया नगर अभियंत्यांच्या शुक्रवारी खामगावात अनोखे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील अनधिकृत बांधकामांना अभय देणाºया नगर अभियंत्यांच्या शुक्रवारी खामगावात अनोखे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. ऐन गुरूपोर्णिमेच्या दिवशी आंदोलन करीत, नगर अभियंत्यांना अवैध बांधकामाचे ‘गुरू’ अशी पदवीही देण्यात आली. त्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींची साधी दखलही घेण्यात आली नाही. सोबतच बांधकाम विभागातील गहाळ असलेल्या फाईलच्या मुद्यावरून सामाजिक कार्यकर्ते नंदलाल भट्टड यांनी ऐन गुरूपोर्णिच्या दिवशी पालिकेत अनोखे आंदोलन केले. नगर अभियंता जोशी यांच्या दालनाबाहेर शाल, श्रीफळ आणि विना शाईचा पेन ठेऊन अनोखा निषेध नोंदविला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगर अभियंता जोशी यांनी नगर पालिका कार्यालयात येण्याचे टाळल्यामुळे त्यांच्या दालनासमोर शाल, श्रीफळ आणि रिकामा पेन ठेवण्यात आला. या आंदोलनामुळे पालिकेत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. शहरातील मुख्य रस्त्यावरील अनधिकृत बांधकामासोबतच शहरातील इतरही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
पुराव्यासहीत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतरही नगर अभियंत्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची नगर अभियंत्यांची मानसिकता नसल्याने, त्यांना विना शाईचा पेन भेट देण्यात आला.
- नंदलाल भट्टड, सामाजिक कार्यकर्ते, खामगाव.