नगर अभियंत्याकडे तीन पदांचा प्रभार
By admin | Published: April 19, 2016 02:34 AM2016-04-19T02:34:37+5:302016-04-19T02:34:37+5:30
खामगाव पालिकेतील प्रकार.
खामगाव: पालिकेतील पाणी पुरवठा विभाग अभियंत्यासह नगर अभियंता दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे उपरोक्त दोन्ही पदाचा पदभार एकाच नगर अभियंत्यावर येवून ठेपल्याने, या अभियंत्यावरील कामाचा ताण वाढला आहे. खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी निलंबित आहेत. त्यामुळे या पदाचा पदभार नांदुरा येथील मुख्याधिकारी धंनजय बोरीकर यांच्याकडे आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे पालिकेचे कामकाज प्रभावित झाले असतानाच, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता संजय मोकासरे एक महिन्याच्या रजेवर गेले आहेत. त्यांच्या पदाचा प्रभार नगर अभियंता अलकरी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. नगर अभियंता आणि पाणी पुरवठा अभियंता पदाचा पदभार सांभाळत असतानाच, नगर अभियंता भगत १८ एप्रिलपासून १५ दिवसांच्या दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे भगत यांच्याही पदाचा पदभार नगर अभियंता अलकरी यांच्याकडे देण्यात आला आहे. तथापि, आधीच दोन पदाचा पदभार सांभाळताना आता तिहेरी भूमिका अदा करावी लागणार आहे.