विठ्ठलवाडीत दोन गटांत हाणामारी; ३८ जणांवर गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Published: March 26, 2024 05:29 PM2024-03-26T17:29:10+5:302024-03-26T17:29:46+5:30
दोन्ही गटांचे १५ जण जखमी; ३० जणांना केली अटक.
संदीप वानखडे, बुलढाणा :पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या विठ्ठलवाडी येथे हाेळीच्या दिवशी दाेन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दाेन्ही गटांचे १५ जण जखमी झाले आहेत. परस्परविराेधी तक्रारीवरून डाेणगाव पाेलिसांनी दोन्ही गटांच्या ३८ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच आतापर्यंत पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे.
विठ्ठलवाडी येथे होळीनिमित्त धुळवड उत्सव सुरू असताना फिर्यादी बद्रीनाथ दारासिंग चव्हाण यांच्या काकाच्या घरासमोर आरोपी विष्णू शिवराम राठोड, प्रेमदास विजयसिंग राठोड, कैलास शिवराम राठोड, अतुल विष्णू राठोड, अनिकेत विष्णू राठोड, पृथ्वीराज प्रेमदास राठोड, रोहित गजानन राठोड, संतोष बसंता राठोड, अभय कैलास राठोड, कुणाल उत्तम राठोड, बळीराम गजानन राठोड, चंदन लालसिंग राठोड, किशोर लालसिंग राठोड, ज्ञानेश्वर मनुसिंग राठोड, विलास प्रताप राठोड यांनी दगड, लाठ्या, कुऱ्हाड व विळा घेऊन आरडाओरडा करून यातील फिर्यादी बद्रीनाथ दारासिंग चव्हाण व साक्षीदार यांना जीवाने मारण्याच्या धमक्या दिल्या. या तक्रारीवरून आराेपींविरुद्ध पाेलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक गाढवे करीत आहेत.
दुसऱ्या गटाचे कैलास शिवराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संतोष धावजी चव्हाण, ज्ञानेश्वर संतोष चव्हाण, गोकुळ संतोष चव्हाण, दारासिंग धावजी चव्हाण, बद्रीनाथ धारासिंग चव्हाण, नारायण धारासिंग चच्छाम, सूरज दिलीप बरहाण, दिलीप धावजी चव्हाण, रोहिदास धावजी चव्हाण, गोपाल रोहिदास चव्हाण, धनराज मानसिंग राठोड, सुनील जगराम राठोड, चेतन अंकुश चव्हाण, नितीन अंकुश चव्हाण, शैलेश अंकुश चव्हाण, शीतल ज्ञानेश्वर चव्हाण, गीताबाई संतोष बंडाम, फुलाबाई दारासिंग चव्हाण, कांताबाई दिलीप चव्हाण, विद्या राठोड, शेषराव रामदास राठोड, सागर शेषराव राठोड, आकाश शेषराव राठोड (सर्व रा. विठ्ठलवाडी) यांनी लहान मुलांच्या भांडणावरून लाेखंडी राॅड व काठ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका संजय घिके यांच्याकडे दिला. तर दोन्ही गटांतील १५ जखमींना उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे. तसेच ३० जणांना अटक करण्यात आली आहे़