लहान मुलांच्या भांडणावरुन हाणामारी
By admin | Published: October 9, 2016 01:58 AM2016-10-09T01:58:42+5:302016-10-09T01:58:42+5:30
चिखली तालुक्यातील घटना; परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हा दाखल.
अमडापूर(जि. बुलडाणा), दि. 0८- चिखली तालुक्यातील महिमळ येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी होऊन परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबत अमडापूर पो.स्टे.मधून मिळालेली माहिती अशी की, रमेश किसन येवले रा.महिमळ यांनी तक्रार दिली की, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपी ज्ञानेश्वर रामकिसन शेळके, अर्जुन तुकाराम शेळके, पांडुरंग नामदेव शेळके, छाया ज्ञानेश्वर शेळके यांच्या लहान मुलासोबत आमच्या लहान मुलाचे भांडण झाले होते. या कारणावरून सायंकाळी ७.३0 वाजेला वरील चारही आरोपींनी घरात प्रवेश करून काडीने मारहाण केली व वडिलांच्या डोक्यास मार लागला, तसेच पत्नी व मलासुद्धा मारहाण करुन शिवीगाळ केली, अशी तक्रार रमेश किसन येवले रा.महिमळ यांनी दिल्यावरुन आरोपी ज्ञानेश्वर रामकिसन शेळके, अर्जुन तुकाराम शेळके, पांडुरंग नामदेव शेळके, छाया ज्ञानेश्वर शेळके यांच्याविरुद्ध अप.नं. २३३/0१६, कलम ३२४, ४५२, ५0४, ५0६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला.
अर्जुन तुकाराम शेळके (२४) रा.महिमळ यांनी तक्रार दिली की, आरोपी रमेश किसन येवले, किसन लक्ष्मण येवले, अल्का रमेश येवले, सुभद्रा किसन येवले सर्व रा.महिमळ यांनी मी माझ्या काकाच्या घरी जेवण करण्यासाठी गेलो असता, शिवीगाळ करुन लहान मुलांच्या भांडणावरून माझ्या दंडावर विळ्याने मारले व काका, काकू यांनासुद्धा मारहाण केली.
यावरुन अप.नं. ३३४/0१६ कलम ३२४, ३२३, ५0४, ५0६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.