धार्मिक स्थळासमोर नारेबाजी केल्याने दोन गटात हाणामारी

By निलेश जोशी | Published: March 30, 2023 07:44 PM2023-03-30T19:44:53+5:302023-03-30T19:45:13+5:30

परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील ३८ जणांवर गुन्हे, सात जखमी

Clashes between two groups due to shouting slogans in front of a religious place | धार्मिक स्थळासमोर नारेबाजी केल्याने दोन गटात हाणामारी

धार्मिक स्थळासमोर नारेबाजी केल्याने दोन गटात हाणामारी

googlenewsNext

नीलेश जोशी, मोताळा (बुलढाणा): येथील एका धार्मीक स्थळासमोर नारेबाजी केल्याने दोन गटात वाद होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन सात जण जखमी झाल्याची घटना २९ मार्च रोजी रात्री मोताळा येथे घडली. प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील प्रत्येकी १६ या प्रमाणे ३८ जणावर गुन्हा दाखल केला आहे.

मोताळा येथील एका धार्मिक स्थळासमोर २९ मार्च रोजी रात्री काही युवकांनी नारेबाजी केली. त्याची विचारणा करण्यास गेलेले शेख रशीद आणि काही युवक गेले असता ज्ञानेश्वर राजू सपकाळ, सोपान सपकाळ, बाळू किरोचे, धनराज सोळंके, सुमीत विठ्ठल सोनुने, योगेश न्हावी, विठ्ठल तानाजी तायडे, गणेश तायडे, सचीन घडेकर, शिवा घडेकर यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना मारहाण करत चौघांना जखमी केले, असे तक्रारीत नमूद आहे. यात शेख अन्सार शेख युनीस यास जबर मार लागल्याने त्यास बुलढाणा व तेथून छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

याप्रकरणी शे. रशीद शे. खलील यांनी बोराखेडी पोलीसात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी उपरोक्त दहा आणि इतर पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. आहे. तपास पीएसआय विजयकुमार घुले हे करीत आहे.

दुसऱ्या गटातील विठ्ठल तानाजी तायडे यांनीही प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार २९ मार्च रोजी रात्री खाजा नगर मध्ये शे. कलीम शे. युनूस, शे. अनसार शे. युनूस, शे. अरशद शे. बुडन, शे. रशीद शे. खलील, अरबाज खान कलीम खान आणी वसीम शाह छोटू शाह यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तुम्ही येथे घोषणा का दिल्या असे म्हणत काठ्या आणी फळ कापण्याचे कटर आणी विटाने तायडे आणि त्यांच्या सोबतच्या अन्य व्यक्तींना मारहाण केली. त्यात तीन जण जखमी झाले आहेत. त्यावरून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पीएसआय अशोक रोकडे करीत आहेत.

दोन्ही गटातील सहा जण ताब्यात

घटनेचे गांभिर्यपहाता अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, एसडीपीअेा सचीन कदम, ठाणेदार बळीराम गीते यांनी घटनास्थळ गाठून जमावाला शांत केले. सोबतच रात्रीच या प्रकरणात दोन्ही गटातील सहा जणांना ताब्यात घेतले.

Web Title: Clashes between two groups due to shouting slogans in front of a religious place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.