‘स्वच्छ भारत’ अभियानाला शेगाव येथे सुरुवात
By admin | Published: October 30, 2014 11:58 PM2014-10-30T23:58:19+5:302014-10-30T23:58:19+5:30
अमरावती विभागीय आयुक्तांनी घेतला पुढाकार
शेगाव (बुलडाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गुरुवारी संतनगरी शेगावात अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर व त्यांच्या सहकार्यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.
यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी चिंतामण जोशी, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, विकास आराखडा अधिकारी आंबेकर, तहसीलदार डॉ.रामेश्वर पुरी, मुख्याधिकारी के.जी. मुल्लानी, सा.बां. विभागाचे परिहार, नगराध्यक्ष बंडूबाप्पू देशमुख, प्रशासन अधिकारी डोईफोडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका व महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी शहर स्वच्छतेला सुरुवात केली.
यावेळी सर्वांनी स्वत: हातात झाडू व फावडे घेऊन रेल्वे स्टेशन ते गजानन महाराज मंदिर परिसरापर्यंत स्वच्छता केली. यावेळी न.प. उपाध्यक्ष ज्योती मुंधडा, नगरसेवक शरद अग्रवाल, किरण देशमुख, राजू वाघ, सुनीता कलोरे, कमलाकर चौहान, राजू चुलेट आदींची उपस्थिती होती.
या अभियानात नगरपालिकेच्या सर्व शाळांचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. एका दिवसात संपूर्ण शहराची स्वच्छता शक्य नसली तरी स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहोचावा, हा यामागील उद्देश असून, नागरिकांनी शहराच्या स्वच्छतेसाठी न.प.ला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी मुल्लानी यांनी केले.