‘स्वच्छ भारत’चे शौचालय तोडले; एकाविरुद्ध गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:42 AM2018-04-27T01:42:02+5:302018-04-27T01:42:02+5:30
खामगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय योजनेतून बांधलेले शौचालय तोडून २० हजारांचे नुकसान केल्याची घटना तालुक्यातील बोथाकाजी येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय योजनेतून बांधलेले शौचालय तोडून २० हजारांचे नुकसान केल्याची घटना तालुक्यातील बोथाकाजी येथे घडली.
मनोहर सुखदेव हिवराळे (वय ५८) यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासकीय योजनेतून मिळालेल्या अनुदानातून घरासमोर शौचालय बांधले होते. शेजारी सागर राजाराम हिवराळे याने विनाकारण सदर शौचालय तोडून २० हजारांचे नुकसान केले. या तक्रारीवरून पोलिसांनी सागर हिवराळेंविरुद्ध कलम ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात शौचालयांचे फोटो काढण्यासाठी जाणाºया कंत्राटी कर्मचाºयांनाही मारहाण होत आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानातील कर्मचारीही धास्तावले आहेत. त्यातच हा प्रकार घडल्याने भविष्यात शौचालयांचा ग्रामीण भागात कितपत वापर होईल, हा प्रश्नच आहे.