तरुणाईचे बसस्थानकावर स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:23 AM2017-10-02T01:23:44+5:302017-10-02T01:24:07+5:30

Cleanliness drive of youth bus station | तरुणाईचे बसस्थानकावर स्वच्छता अभियान

तरुणाईचे बसस्थानकावर स्वच्छता अभियान

Next
ठळक मुद्देदसर्‍याच्या  दिवशी बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आलेसाफसफाई, रांगोळ्या काढून केले सुशोभिकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील तरुणाई फाऊंडेशनच्या वतीने दसर्‍याच्या  दिवशी बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  यावेळी सुमारे तीन तास साफसफाई करुन व रांगोळ्या काढून  सुशोभिकरण करण्यात आले.
दसर्‍याच्या अनुषंगाने साफसफाई करण्याचा प्रघात आपल्याकडे  आहे. सदर बाब लक्षात घेवून तरुणाई फाऊंडेशनच्यावतीने  बसस्थानकावर साफसफाई करण्याचे ठरले होते. त्यानुसार  शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तरुणाई फाऊंडेशनचे  १२ ते १५ कार्यकर्ते बसस्थानकावर हजर झाले. सदर कार्यक र्त्यांंनी सकाळी १0 वाजेपर्यंंत बसस्थानकाच्या आवारात  साफसफाई केली. यावेळी कंपांऊंडलगतची काटेरी झुडपे सुध्दा  तोडण्यात आली. तसेच ठिकठिकाणी रांगोळ्या काढून परिसर  सुशोभित करण्यात आला. सदर उपक्रमात तरुणाईचे राजेंद्र  कोल्हे, नारायण पिठोरे, बाळू पाटील, उमाकांत कांडेकर,  प्रणंजय कांडेकर, अविनाश सोनटक्के, तेजस सोनटक्के, मंथन  सोनटक्के, ज्ञानेश्‍वर अढाव, हर्ष अढाव, अमोल तायडे, संजय  छल्लानी, तेजस छल्लानी, सुवर्णा पवार, शरद पवार, आनंद देवक ते, विश्‍वास देशमुख, सचिन ठाकरे आदींनी सहभाग घेतला.

उपक्रमाचे कौतुक
ऐन दसर्‍याच्या दिवशी तरुणाईच्या कार्यकर्त्यांंनी बसस्थानकावर  स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश  दिल्याने अनेक जणांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तरुणाईच्या  या कार्यामुळे बसस्थानक परिसर चकाकून गेला होता. त्यामुळे  प्रवाशी वर्गाकडूनही आनंद व्यक्त करण्यात आला.

Web Title: Cleanliness drive of youth bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.