‘स्वच्छता ही सेवा’ लोकचळवळ व्हावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:48 AM2017-09-18T00:48:47+5:302017-09-18T00:49:01+5:30
घर, परिसर आणि आता शहर स्वच्छतेच्या माध्यमातून ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन राज्याचे कृषी त था फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे केले.
खामगाव: घर, परिसर आणि आता शहर स्वच्छतेच्या माध्यमातून ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन राज्याचे कृषी त था फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे केले.
खामगाव नगरपालिकेच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ या उ पक्रमाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी खामगाव पालिकेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस् थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. अँड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार सुनील पाटील, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, पाणीपुरवठा सभापती सतीशआप्पा दुडे, आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, ज्येष्ठ साहित्यिक रामदादा मोहिते, नगरसेवक हिरालाल बोर्डे, ओम शर्मा, भाजप शहर अध्यक्ष संजय शिनगारे, अनिता देशपांडे, जान्हवी कुळकर्णी, शेखर पुरोहित, लक्ष्मीनारायण ग्रुपचे तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी झाडू, टोपले, कुदळ आणि स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या शस्त्रांचे पूजन कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केले. त्यानं तर कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छताविषयक पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिकंली.
खामगाव नगरपालिकेत आणि शहरातील विविध चौकांत या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी नगरसेविका भाग्यश्री मानकर, विनोद टिकार, संतोष पुरोहित, महेंद्र रोहणकर, गणेश सोनोने यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी होते. यावेळी मुक्तांगण, तरुणाई, आयएमए आणि इतर या सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी काही ठिकाणी स्वच्छताही केली. संचालन वैभव डवरे, राजेंद्र झनके यांनी केले. आभार नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी मानले.
आमदारांनी दिली स्वच्छतेची शपथ!
खामगाव मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा शुभारंभ करताना उ पस्थित विद्यार्थी आणि संस्थांच्या पदाधिकार्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धारही विविध सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात आला.