गोहोगाव दांदडे येथील शेतरस्ता वहिवाटीस मोकळा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:39+5:302021-07-04T04:23:39+5:30
मेहकर : गोहोगाव दांदडे ते कऱ्हाळवाडी शेतरस्त्याचा प्रश्न साेडविण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ८ जून राेजी निवेदन देऊन ...
मेहकर : गोहोगाव दांदडे ते कऱ्हाळवाडी शेतरस्त्याचा प्रश्न साेडविण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ८ जून राेजी निवेदन देऊन करण्यात आली हाेती. मात्र, या निवेदनाची दखल न घेतल्याने १ जुलै राेजी मेहकर तहसील कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी संघटनेचे युवानेते भागवत जाधव यांनी कृषी दिनी शेतकरी बांधवांना आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी उपोषण करावे लागते, हे दुर्दैवी असल्याचे सांगितले तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. लाक्षणिक उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रफुल देशमुख, अश्फाक भाई, गणेश धाबे, सलीम शहा, अफरोज भाई जावेद शहा, दत्ता शेळके, सलीम बिबन शहा, दीपक दांदडे, अरविंद दांदडे, संतोष भालेराव, भुजंगराव दांदळे, दिगंबर मुरकुटे, शेख राजू शेख जब्बार, शेख भिकन शेख न्यू, सिद्धेश्वर बोंद्रे, ज्ञानेश्वर दांदडे, सुनील दांदडे, मिनेश दांदडे, दिलीप भालेराव, राजू कानकटाव, गजानन कानकटाव, रामेश्वर गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, शेख रहेमान शेख अब्दुल, रामा बोंद्रे, सुनील दांदडे, पोलीस पाटील सोनू काळे, संतोष काळे, रमेश काळे, भागवत दांदडे, भास्कर दांदडे, सुदर्शन काळे, गंगाराम मानवतकर, आश्रू काळे, स्वप्निल काळे, दत्तात्रय काळे यांसह गोहोगाव दांदडे येथील शेतकरी बांधव व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.