धाड ते दाताळा रस्ता दुरुस्तीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:33 AM2021-03-21T04:33:41+5:302021-03-21T04:33:41+5:30

धाड ते जामठी गिरडा फाटा मार्गे दाताळा डांबरी रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल ...

Clear the road from Dhad to Datala | धाड ते दाताळा रस्ता दुरुस्तीचा मार्ग मोकळा

धाड ते दाताळा रस्ता दुरुस्तीचा मार्ग मोकळा

Next

धाड ते जामठी गिरडा फाटा मार्गे दाताळा डांबरी रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल बुलडाणा जिल्हा अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांनी सार्वजनिक बांधकाम अभियंता बुलडाणा यांच्याकडे केली होती. २५ दिवसात दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास जामठी येथे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान, १६ मार्च रोजी जामठी येथे मनोज दांडगे यांनी आंदोलन सुरू केले असता, काही तासातच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी येऊन दांडगे यांना लवकरच कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले. उर्वरित काम सहा महिन्यांच्या आत पूर्ण करू असे सांगितले. दरम्यान, लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मनोज दांडगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या प्रसंगी बिलाल गायकवाड, मंगेश तायडे, रमेश तायडे, रामेश्वर तायडे, गजानन तायडे, विलास तायडे, निर्मला ताई तायडे, रामदास तायडे, जक्का सेठ, प्रकाश तायडे, कौतिकराव नरोटे, अजय तायडे, सलीम खान, समाधान तायडे, शेषराव तायडे, बिलाल गायकवाड, मनोहर तायडे, प्रकाश लांडे, विशाल सिनकर, गजूबा रावळकर, विठोबा थोरात, श्रीकृष्णा तायडे, शेख जफ्फर, अमीन खा साहेब, सिकंदर तडवी, विनोद गायकी, विनोद तायडे, रमेश रावळकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Clear the road from Dhad to Datala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.