हवामान आधारित शेती करणे सध्याची गरज - डख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:00+5:302021-02-06T05:05:00+5:30
ते विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. चक्रीवादळापासून तर पाऊस कसा मोजायचा आणि यशस्वी पेरणी कधी-कशी करायची, याचा कानमंत्र ...
ते विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. चक्रीवादळापासून तर पाऊस कसा मोजायचा आणि यशस्वी पेरणी कधी-कशी करायची, याचा कानमंत्र त्यांनी शेतकऱ्यांना दिला. हिवरा आश्रम येथील शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात २ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता ४ फेब्रुवारीला झाली. शेवटच्या दिवशी दुपारी दोनला डख यांचे व्याख्यान झाले. तब्बल दीड तास त्यांनी मार्गदर्शन केले. देशातील तब्बल ३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना संदेश पाठवून डख हवामानाबद्दल जागरूक करत असतात. नुकसान टाळण्यासाठी हवामानासंबंधित मेसेज करून ते शेतकऱ्यांना १५ दिवस आधीच अलर्ट करतात. एक वर्षापर्यंतचे ते अंदाज देतात. खडकाळ, डोंगराळ, तळ्याच्या परिसरात, धरणाच्या परिसरात गारपीट होण्याची शक्यता असते. काळी जमीन ज्या भागात असते त्या भागात गारपीट होत नाही. गारपिटीला घाबरून जाण्यापेक्षा या संकटाला तोंड देण्याचे धारिष्ट्य शेतकऱ्यांनी ठेवले पाहिजेत, असेही डख यांनी स्पष्ट केले. यंदा २६ फेब्रुवारपर्यंत वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून यंदा थंडी अधिक काळ राहणार आहे. सध्याचे ढगाळ वातावरण ७ तारखेपर्यंत राहणार असून, त्यानंतर थंडी पुन्हा जाणवायला सुरुवात होईल. ११ फेब्रुवारीनंतर उन्हाचा पारा दिवसा वाढलेला तर रात्री थंडी वाढलेली असेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
असा मोजा घरीच पाऊस
डख यांनी पाऊस मोजण्याचे अजब तंत्र यावेळी सांगितले. त्यांनी शेतातून पाणी बाहेर वाहू लागले की समजावे की २० मिलीमीटर पाऊस झाला आहे. नाल्यात गुडघ्याइतके पाणी वाहू लागले की ३० मि.मी. पाऊस झाला असे समजावे, अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली.