वातावरणातील बदलांचा आंब्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:31 AM2021-04-14T04:31:58+5:302021-04-14T04:31:58+5:30

धामणगाव धाड : जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़. ...

Climate change hits mangoes | वातावरणातील बदलांचा आंब्याला फटका

वातावरणातील बदलांचा आंब्याला फटका

Next

धामणगाव धाड : जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़. कडक उष्णता व पहाटे गार हवा सुटत असून, या बदलत्या वातावरणामुळे पिकांवर दुष्परिणाम होत आहेत़.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, कलिंगड, खरबूज, आंबा या फळांचा हंगाम आहे़. बदलते हवामान, अवकाळी पाऊस यामुळे फळ पिकावर दुष्परिणाम होत असून, आंब्याच्या कैऱ्या खाली पडत आहेत़. त्यामुळे यंदाही आंब्याचा हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत़. ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडत असल्याने याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, कोरोना संसर्ग वाढण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहे़त.

Web Title: Climate change hits mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.