वातावरणातील बदलामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:27 AM2020-12-26T04:27:35+5:302020-12-26T04:27:35+5:30

बिबी परिसरात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने रब्बी ...

Climate change puts farmers in trouble | वातावरणातील बदलामुळे शेतकरी अडचणीत

वातावरणातील बदलामुळे शेतकरी अडचणीत

Next

बिबी परिसरात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने रब्बी पिकांवर राेगराईचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे खरीपपाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. मागील काही दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण झाले हाेते, तसेच धुकेही पडल्याने रब्बी पिके धाेक्यात आली आहेत. वातावरणातील बदलामुळे तूर पिकांची फूलगळ होऊन अळीने आक्रमण केल्याने तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. आधीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आता रब्बी हंगामही सततच्या बदलामुळे, बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आला आहे. तुरीचे उत्पादनही घटले असून, त्यात शेतातील सूडी गंजी पेटविण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. तुरीचे कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी जमा करण्यासाठी बीबी परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. बाेंडअळीमुळे कपाशीची लवकरच उलंगवाडी झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

Web Title: Climate change puts farmers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.