खामगावातील घंटागाडी कामगारांचे शनिवारपासून कामबंद आंदोलन

By अनिल गवई | Published: April 1, 2023 06:19 PM2023-04-01T18:19:07+5:302023-04-01T18:19:26+5:30

शहरातील कचरा संकलीत केल्यानंतरही कंत्राटदाराकडून किमान वेतन दरानुसार पगार दिल्या जात नाही.

Clockwork workers of Khamgaon strike from Saturday | खामगावातील घंटागाडी कामगारांचे शनिवारपासून कामबंद आंदोलन

खामगावातील घंटागाडी कामगारांचे शनिवारपासून कामबंद आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: किमान वेतन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी शहरातील घंटागाडीद्वारे कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन केले. वारंवार कामबंद आंदोलन करूनही या कामगारांच्या समस्यांकडे नगर पालिका प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे, त्यामुळे या कामगारांनी पुन्हा कामबंद आंदोलन छेडले आहे.

शहरातील कचरा संकलीत केल्यानंतरही कंत्राटदाराकडून किमान वेतन दरानुसार पगार दिल्या जात नाही. वेळेवर पगार दिला जात नाही. पगार स्लीप दिली जात नाही. असा आरोप करत शनिवारी जवळपास सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या गाडया रावण टेकडीजवळील अग्निशमन कार्यालयासमोर उभ्या करुन कामबंद आंदोलन केले. एकजुट झालेल्या कर्मचाऱ्यांनी यावेळी आपल्या मागण्यांबाबत घोषणाबाजी केली. कचरा संकलन करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजनेची न.प. मध्ये अंमलबजावणी करावी, सफाई | कर्मचारी व वाहन चालक यांचे किमान वेतनाप्रमाणे पगार द्यावे, सर्व कामगारांना व्यक्तीगत संरक्षणकिट देण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत कंत्राटदार व नगरपालिका किमान वेतन देण्यासंदर्भात अग्रीमेंट करुन देत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
पॐोटो:

Web Title: Clockwork workers of Khamgaon strike from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.