अवैध धंदे बंद करा; अन्यथा खामगाव बंद!

By admin | Published: August 26, 2015 12:29 AM2015-08-26T00:29:20+5:302015-08-26T00:29:20+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन ; सानंदा यानी दिला इशारा.

Close illegal businesses; Otherwise, Khamgaon is closed! | अवैध धंदे बंद करा; अन्यथा खामगाव बंद!

अवैध धंदे बंद करा; अन्यथा खामगाव बंद!

Next

बुलडाणा : खामगाव मतदार संघासह बुलडाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले, टप्प्याटप्प्याने आंदोलनही केले; मात्र अवैध धंदे बंद झाले नाहीत. येणार्‍या काळात धार्मिक उत्सव मोठय़ा प्रमाणात असल्याने या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे खामगाव परिसरातील अवैध धंदे बंद केले नाहीत तर नाइलाजाने खामगाव बंदची हाक द्यावी लागेल, असा इशारा माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुलडाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अवैध धंदे बंद करण्याबाबत वारंवार आंदोलने करून व निवेदने देऊनसुद्धा अवैध धंदे बंद झाले नाहीत. ही खेदजनक बाब आहे. खामगाव शहर हे अतिसंवेदनशील शहर असून, सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे केव्हाही कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काळात गणेशोत्सव, बकरी ईद, गणेश विसर्जन, दुर्गा उत्सव, मोहरम व जगदंबा उत्सव असे विविध धार्मिक सण व उत्सव येत आहेत. राजकीय नेते तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने खामगाव शहरामध्ये अवैध मोबाइल बँक, वरली-मटका, जुगार अड्डे, क्रिकेट सट्टा, अवैध गुटखा विक्री, अवैध प्रवासी वाहतूक यासारखे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. यामध्ये अवैध मोबाइल बँकेचा व्यवसाय करणारे गुंड प्रवृत्तीचे युवक वसुली करून दादागिरी करतात. अवैध मोबाइल बँकेच्या माध्यमातून गरजुंना पैसे देऊन त्या रकमेवर दरमहा ३0 टक्के व्याज आकारून त्यांची पिळवणूक केली जाते. यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांच्या आशीर्वादाने क्रिकेटचा सट्टाही मोठय़ा प्रमाणात खेळल्या जात असून, हा सट्टा चालविण्यासाठी एका बुकीकडून ६0 हजार रुपये महिना पोलिसांना दिल्या जातो, अशी माहिती दिली.

Web Title: Close illegal businesses; Otherwise, Khamgaon is closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.