आधारकेंद्रच निराधार; जिल्ह्यातील ५० टक्के शासकीय आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:13 PM2018-10-04T17:13:57+5:302018-10-04T17:14:16+5:30

आधारकार्ड नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने नागरीकांचे हाल होत असल्याचे दिसून येते.  विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील ११० पैकी ४० पेक्षा अधिक शासकिय आधारसंच बंद आहे.

Closing of 50 percent of government Aadhar card registration centers in the district | आधारकेंद्रच निराधार; जिल्ह्यातील ५० टक्के शासकीय आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद

आधारकेंद्रच निराधार; जिल्ह्यातील ५० टक्के शासकीय आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद

Next

- योगेश फरपट

खामगाव : आधारकार्ड नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने नागरीकांचे हाल होत असल्याचे दिसून येते.  विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील ११० पैकी ४० पेक्षा अधिक शासकिय आधारसंच बंद आहे. बंद पडलेले आधारकार्ड संच सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची अनास्था असल्यामुळे नागरिकांंना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
आधारकार्डला देशात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आधारकार्डचा वापर 90 टक्के वाढला आहे. त्यामुळे जन्मापासून ते मृत्यू पर्यंत आधारकार्ड असणे आवश्यक झाले आहे. पूर्वी आधारकार्ड नोंदणीचे काम खाजगी कंपनीद्वारे केल्या जात असल्यामुळे शहरात अनेक आधारकार्ड नोंदणी केंद्र होते. परंतु गेल्या वर्षभरापासून खाजगी कंपनीचे आधारकार्ड नोंदणी केंद्र सरकारने बंद केले आहे. त्याएवजी शासनाने दिलेले आधारकार्ड नोंदणी संच द्वारेच आधारकार्डची नोंदणी सुरू आहे. परंतु शासनाचे आधारकार्ड नोंदणी संचाची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे नागरीकांना नोंदणीसाठी, दूरुस्तीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. 

४० आधारकार्ड संच आहेत बंद
बुलढाणा जिल्ह्यात शासनाचे ११० आधार नोंदणी संच आहे. नोंदणी संच डीआइटी द्वारा जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र चालकांना देण्यात आले आहे. परंतु यातील ४० पेक्षा अधिक आधारसंच बंद असल्यामुळे जिल्ह्यात केवळ ७० आधारसंच सुरू आहे. त्यामुळे नागरीकांना आधारकार्ड बनविणे किंवा त्यामध्ये बदल करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

का आहेत आधारसंच बंद!
महा ई सेवा केंद्रावर देण्यात आलेले आधारसंच बंद असल्याचे मुख्य कारण आॅपरेटर इनअ‍ॅक्टीव्ह आहे. आधारकार्ड काढण्यासाठी आॅपरेटरची आवश्यकता असते. त्याच्या अंगठ्याचे निशान लावूनच आधारकार्डला मंजुरी देण्यात येते. परंतु युआइडीआई कडून कोणतेही कारण न सांगता जिल्ह्यातील ४० ते ५० आॅपरेटर इनअ‍ॅक्टीव्ह करण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रावरील आधारकार्ड चे काम बंद आहे. इनअ‍ॅक्टीव्ह असलेले आधारकार्ड आॅपरेटर यांनी डीआइटी आणि महाआॅनलाईनच्या जिल्हा समन्वयकांशी वेळोवेळी संपर्क साधला आहे. परंतु वरीष्ठ कार्यालयातून नवीन आॅपरेटर किंवा आॅपरेटर अ‍ॅक्टीव करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

- जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्राचे काही आॅपरेटर इनअ‍ॅक्टीव्ह झाले आहे. कारवाई झाल्याने काही ब्लॅकलिस्ट केले आहेत. तांत्रीक अडचणीमुळे बंद असलेले केंद्र सुरु करण्याचे काम सुरु आहे. गणेश शेवत्रे, जिल्हा समन्वयक, महाआॅनलाइन कंपनी. 

- जिल्ह्यातील आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरळीत सुरू आहेत. ११० पैकी ९० केंद्रे सुरु आहेत. मी संबधितांशी दोन दिवसापूर्वीच चर्चा केली आहे. जी केंद्रे बंद आहेत ती सुरु करण्याबाबत सुचना देतो. - ललीत वराडे, निवासी उपजिल्हाधिकारी, बुलढाणा.

Web Title: Closing of 50 percent of government Aadhar card registration centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.