कापड दुकान फोडले; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:03 AM2018-03-16T01:03:18+5:302018-03-16T01:03:18+5:30

दुसरबीड(बुलडाणा) :  अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Clothed shop; Laxas worth 90 thousand | कापड दुकान फोडले; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

कापड दुकान फोडले; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देदुकानाचे शटर तोडून आत प्रवेश

दुसरबीड(बुलडाणा) :  अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण लक्ष्मणराव पवार यांच्या मालकीचे हे सीमा ड्रेसेस व कापड केंद्र आहे. अज्ञात चोरट्यांनी पहाटे एक ते पाचच्या दरम्यान दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. सोबतच दुकानातील अन्य साहित्याचे मोठे नुकसान केले. दुकानामधील १६ सीसी कॅमेरेही फोडले. सोबतच दुकानातील नगदी २० हजार रुपये रोख, २५ हजार रुपयांचे कापड आणि अन्य माल अशी एकूण ९० हजार रुपयांची चोरी केली आहे. दुकानात चोरी करून चोरटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पसार झाले. 
याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बी. एन. नलावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार जनार्धन शेवाळे, दुय्यम ठाणेदार किशोर शेरकी, अशोक मांटे, जाकेर पठाण व त्यांचे सहकारी करीत आहेत. 

Web Title: Clothed shop; Laxas worth 90 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.