कोफ्रेंडली बाप्पा; कार्यशाळेत अनेकांनी घेतले गणेश मूर्तीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:12+5:302021-08-23T04:36:12+5:30

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणेश किंवा दुर्गा मूर्ती बनविण्याची पद्धत पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी ठरत आहे. पॅरिसची ही माती पाण्यात लवकर ...

Co-friendly Bappa; Many took training of Ganesh idol in the workshop | कोफ्रेंडली बाप्पा; कार्यशाळेत अनेकांनी घेतले गणेश मूर्तीचे प्रशिक्षण

कोफ्रेंडली बाप्पा; कार्यशाळेत अनेकांनी घेतले गणेश मूर्तीचे प्रशिक्षण

Next

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणेश किंवा दुर्गा मूर्ती बनविण्याची पद्धत पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी ठरत आहे. पॅरिसची ही माती पाण्यात लवकर विरघळत नाही, किंवा लवकर नष्ट होत नाही. त्यामुळे पर्यावरणाला याचा मोठा फटाका बसत आहे. या पुढील काळात आपले पर्यावरण सांभाळायचे असेल तर शेतातील काळी माती किंवा शाडू मातीपासून मूर्ती तयार व्हाव्यात हा उद्देश समोर ठेवून येथील उमंग यूथ फाऊंडेशनचा पदाधिकाऱ्यांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. रामेश्वर जामदार यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून रमेश काळे, मार्गदर्शक म्हणून रवींद्र जामदार यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत ५० पेक्षा जास्त नागरिक,युवकांनी सहभाग घेऊन गणेश मूर्ती घरीच बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.

Web Title: Co-friendly Bappa; Many took training of Ganesh idol in the workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.