समन्वयातून कोरोना लढ्यात महत्त्वाची भूमिका - डॉ. दिलीप पाटील भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:57 AM2020-05-24T10:57:36+5:302020-05-24T10:58:02+5:30

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याशी साधलेला संवाद.

Co-ordination plays an important role in the Corona fight - Dr. Dilip Patil Bhujbal | समन्वयातून कोरोना लढ्यात महत्त्वाची भूमिका - डॉ. दिलीप पाटील भुजबळ

समन्वयातून कोरोना लढ्यात महत्त्वाची भूमिका - डॉ. दिलीप पाटील भुजबळ

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सकारात्मक दृष्टीकोण वृद्धींगत करत पोलिस दलाचे मनोबल उंचावलेले असल्याने कोरोना लढ्यात पोलिस प्रशासन आरोग्य, महसूल, जिल्हा परिषद प्रशासनासोबत समन्वयातून जमिनस्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. प्रतिबंधीत क्षेत्राच्या आखणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ते साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह संचारबंदीची कडक अंमलबजाणी करण्यात पोलिस प्रशासन कार्यरत आहे. मधल्या काळात ३८ पोलिसही संदिग्ध रुग्ण म्हणून समोर आले होते. त्यामुळे पोलिस प्रशासन चर्चेत आले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याशी साधलेला संवाद.


कारोना संदर्भाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कशी हाताळत आहात?
कोरोना संदर्भाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, यादृष्टीने चोख उपाययोजना केल्या आहेत. संचारबंदीचे उल्लंघन, हिंसेची प्रकरणे, सायबर गुन्हे आणि शासकीय कामातील अडथळे यासंदर्भाने जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीच्या संदर्भाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.


प्रतिबंधीत क्षेत्र व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या दृष्टीने पोलिसांची भुमिका काय?
पोलिसांनी प्रो अ‍ॅक्टीव भूमिका असून पॉझिटिव्ह रुग्ण आढळ््यानंतर प्रतिबंधीत क्षेत्राचे स्टॅक्चर, केंद्रबिंदू, बफर झोन निर्मितीसाठी एसडीओ, जिल्हाधिकारी यांना त्वरित माहिती देणे पॉझिटिव्ह रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह, ये-जा करणाऱ्यांची तपासणी व संचारबंदीच्या अंमलबजावणीचे दायित्व पोलिसांचे आहे.


पोलिसांच्या आरोग्यसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत.?
पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी अनेक उपक्रम घेतले. माझे आरोग्य माझ्या हाती, मीच माझा रक्षक अशी भूमिका घेऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा व साहित्य दिले आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रतिकार शक्ती वर्धक काढ्याचाही उपक्रम राबविला.


‘त्या’ कर्मचाºयांचे प्रकरण कसे हाताळले?
कामठी येथील धर्मप्रचारकांपैकी तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना प्रारंभी परत जाण्याची परवानगी देण्याच्या निमित्ताने ३८ पोलिस कर्मचारी त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू सकारात्मक मानसिकता ठेवून सर्व पोलिस कर्मचारी सामोरे गेले. त्यामुळे त्यांच्या चाचण्याही निगेटीव्ह आल्या. एका कर्मचाºयाच्या रिपोर्ट संदर्भा त अडचण होती. मात्र कणखरतेच्या जोरावर त्यानेही मात केली. या काळात या पोलिस कर्मचाºयांच्या कुटुंबियांशी सतत संवाद साधून त्यांना आधार देत पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून आपण जबाबदारी सांभाळली.

Web Title: Co-ordination plays an important role in the Corona fight - Dr. Dilip Patil Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.