महावितरणच्या अधिका-यांना काँग्रेसचा घेराव
By admin | Published: September 14, 2016 01:02 AM2016-09-14T01:02:47+5:302016-09-14T01:02:47+5:30
शेतक-यांना नियमित वीज पुरवठा न दिल्यास जिल्हा नियोजन बैठकीत हल्लाबोल करण्याचा काग्रेसचा इशारा.
चिखली(जि.बुलडाणा), दि. १३ : शेतकर्यांना नियमित वीज पुरवठा न दिल्यास शेतकरी जिल्हा नियोजनच्या बैठकीत हल्लाबोल करतील, त्यावेळी परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिला. चिखली मतदार संघातील दुधा परिसरातील शेतकर्यांसह आ.बोंद्रे यांनी, अधिकार्यांनी १२ सप्टेंबर रोजी घेराव घातला होता. यावेळी आ.बोंद्रे यांनी अधिकार्यांना नियमित वीज पुरवठय़ासाठी चांगलेच धारेवर धरले.
सलग तीन वष्रे दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकर्यांना यावेळी काही अंशी दिलासा मिळाला आहे; मात्र सोयाबीनचे पीक ऐन भरात असताना पावसाने दडी मारल्यामुळे हाताशी आलेले पीक उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत धडपड करून शेतकरी पिके वाचण्यासाठी उपलब्ध जलसाधनांच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र त्यांच्या या प्रयत्नांना विद्युत कं पनीच्या गलथान कारभारामुळे अपयश येत असून, धाड वीज उपकेंद्रांतर्गत हातेडी पॉवर स्टेशन अं तर्गत येणार्या देवपूर, दुधा, दहीद खु., माळवंडी या गावात गत ४८ तासांमध्ये केवळ सहा तास वीज मिळाल्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. याची गंभीरतेने दखल शेतकर्यांसह आ.बोंद्रे यांनी जिल्हा वीज कार्यालयात अधिकार्यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले. एकीकडे मु ख्यमंत्री १२ तास अखंड वीज पुरवठा करू, अशा घोषणा करतात. प्रत्यक्षात मात्र आठवडाभरात १२ तासही शेतकर्यांना नियमित वीज मिळत नाही, ही बाब अत्यंत खेदजनक असून, शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी असल्याने वीज पुरवठय़ातील अडथळे दूर करून शेतकर्यांना दिवसा तून किमान आठ तास नियमित वीज द्या, अन्यथा शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. यावेळी जिल्हा विद्युत अधिकारी पठाडे, झिझलवार, धाड येथील अभियंता कायंदे यांनी असलेल्या त्रुटी दूर करून शेतकर्यांना तत्काळ वीज पुरविण्याचे आश्वासन दिले. यावेळी दुधा व परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.