बुलडाणा उपविभागात आचारसंहिता लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:16+5:302020-12-31T04:33:16+5:30

बुलडाणा : बुलडाणा उपविभागात बुलडाणा व चिखली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने १८ जानेवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली ...

Code of Conduct applicable in Buldana subdivision | बुलडाणा उपविभागात आचारसंहिता लागू

बुलडाणा उपविभागात आचारसंहिता लागू

googlenewsNext

बुलडाणा : बुलडाणा उपविभागात बुलडाणा व चिखली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने १८ जानेवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये, या दृष्टिकोनातून कलम १४४ उपविभागात लागू करण्यात आले आहे. त्यानुसार बुलडाणा उपविभागात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारांना प्रचाराच्या वेळी त्यांच्या वाहन ताफ्यात एकापेक्षा जास्त वाहन वापरता येणार नाही. तसेच निवडणूकीचे प्रचारासाठी वापरायचे वाहनांची परवानगी संपूर्ण ग्राम पंचायत क्षेत्रासाठी संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून घेणे आवश्यक आहे.

प्रचार कार्यासाठी संबंधीत निवडणूक अधिकारी यांच्याकडे नोंदणी न करण्यात आलेले कोणतेही वाहन प्रचार कार्यासाठी वापरता येणार नाही. उपविभागात ग्रामपंचायत मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यांपासून २०० मीटरच्या आत कोणताही मंडप तथा कार्यालय उभारण्यास बंदी असणार आहे. जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एकापेक्षा जास्त मतदान केंद्रे असतील तेथे अशा मतदान केंद्रांच्या गटासाठी त्या जागेच्या १०० मीटरच्या अंतरापलीकडे उमेदवाराच्या केवळ एकाच मंडपाला परवानगी आहे.

उपविभागात निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष, संघ, संस्थाने, उमेदवार, प्रतिनिधी यांनी सार्वजनिक जागा, शासकीय व निमशासकीय कार्यालयाची इमारत व जागेवरील लावलेली भित्तीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स कटआऊट त्वरित काढून टाकावीत. खासगी जागा, इमारतीवरील संबंधित जागामालकाच्या लेखी संमतीशिवाय लावलेली भित्तीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट त्वरित काढून टाकावीत. उपविभागात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र व परिसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे बुलडाण्याचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी रूपेश खंडारे यांनी कळविले आहे.

Web Title: Code of Conduct applicable in Buldana subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.