संग्रामपूर येथे गोठय़ाला आग; दोन लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:57 AM2018-04-15T00:57:33+5:302018-04-15T00:57:33+5:30

वरवट बकाल : संग्रामपूर येथील शेतातील गुरांच्या गोठय़ाला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजता घडली. या आगीत शेतीसाहित्य खाक झाले असून, एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे शेतकर्‍याचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले.

Cold fire at Sangrampur; Two lakh losses | संग्रामपूर येथे गोठय़ाला आग; दोन लाखाचे नुकसान

संग्रामपूर येथे गोठय़ाला आग; दोन लाखाचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देशेती साहित्य जळून खाक म्हशीचा होरपळून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल : संग्रामपूर येथील शेतातील गुरांच्या गोठय़ाला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजता घडली. या आगीत शेतीसाहित्य खाक झाले असून, एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे शेतकर्‍याचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले.
तामगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या संग्रामपूर शेतशिवारातील अल्प भूधारक शेतकरी ज्ञानेश्‍वर शंकर व्यवहारे, वासुदेव शंकर व्यवहारे व मनोहर शंकर व्यवहारे या तीन भावांनी गावात जागे अभावी शेतातच गुरांसाठी लहान गोठे तयार केले होते. या गोठय़ात एका म्हशीसह गुरांचा चारा व ठिबक सिंचनाच्या नळ्या आदी शेती साहित्य होते; मात्र शनिवारी दुपारी गोठय़ाला अचानक आग लागल्याने शेतीचे संपूर्ण साहित्य खाक झाले. या आगीत म्हशीचा होरपळून मृत्यू झाला. आग लागल्याची माहिती कळताच ग्रामस्थांनी आग विझवण्याकरिता गोठय़ाकडे धाव घेऊन प्रयत्न केले. आग विझविण्यासाठी जळगाव जामोद येथील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते. तर आग उशिरा आटोक्यात आली. दरम्यान, तलाठी विनोद भिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना सादर केला. 
या घटनेमुळे शेतकर्‍याचे अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले   असल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान, घटनास्थळी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार इंगळे यांनी कर्मचार्‍यांसह भेट दिली.
 

Web Title: Cold fire at Sangrampur; Two lakh losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.