विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:39 AM2021-03-01T04:39:59+5:302021-03-01T04:39:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माेताळा : शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून साेमवारपर्यंत लाॅकडाऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
माेताळा : शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून साेमवारपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर तालुका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या नेतृत्वात महसूल विभाग, पोलीस प्रशासन व नगर पंचायत विभाग हे संयुक्तपणे ही कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले हाेते.
जिल्हाभरात शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून सोमवार, १ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत कडक संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यामध्ये दूध विक्रेते व दूध वितरण केंद्र यांना सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत व संध्याकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तर दवाखाने, रुग्णवाहिका सेवा, एस. टी. वाहतूक आसन क्षमतेच्या पन्नास टक्के, मालवाहतूक व पेट्रोल पंप हे चोवीस तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू ठेऊन पूर्वनियोजित परीक्षा वेळापत्रकानुसार व बँका त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मुभा देण्यात आली आहे. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग, पोलीस व नगर पंचायत प्रशासनाने संयुक्तपणे दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला होता. यावेळी विनामास्क फिरणाऱ्यांकडून शंभर ते दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच विनापरवानगी सुरू असलेल्या दुकानदारांकडूनही दंड वसूल करण्यात आला.