मास्क न वापरणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:29 AM2021-02-18T11:29:39+5:302021-02-18T11:29:51+5:30

Buldhana collector आदेशाचे पालन करणाऱ्या नागरिक व युवकांना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी रस्त्यावर उतरून समज दिली.

The Collector gave an understanding to those who do not use masks | मास्क न वापरणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली समज

मास्क न वापरणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली समज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाबाधितांची जिल्ह्यात वाढती संख्या पाहता मास्क न वापरणाऱ्या व जमावबंदी आदेशाचे पालन करणाऱ्या नागरिक व युवकांना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी १७ फेब्रुवारी रोजी थेट शहरात रस्त्यावर उतरून समज दिली. दरम्यान पालिका मुख्याधिकारी व तहसिलदारांना शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी आदेशाची गंभीरतेने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी सकाळी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जमावबंदी आदेश लागू केला. सोबतच अनुषंगिक अनेक बाबी या आदेशात नमूद केल्या आहेत. पालिका, तहसिल आणि ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्तरावर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. आदेश पारित करताच त्यांनी थेट शहरातील रस्त्यावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना मास्क न वापरल्याप्रकरणी त्यांनी समज दिली. यासोबतच पालिका प्रशासाने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेले तीन पथक नेमके काय करत आहेत, याचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तहसिलदार रुपेश खंडारे, पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे व अन्य अधिकारी होते. पालिकेच्या तीनही पथकांनी पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय परिसर व एसबीआय चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांना दंड केला. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मंगळवारीही नगर पालिका परिसर, आठवडी बाजारात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या समवेत जात दुकानातील ग्राहक, दुकान मालक यांना मास्क वापरण्याबाबत समज दिली.  एका लग्न समारंभातही त्यांनी पाहणी केली.

Web Title: The Collector gave an understanding to those who do not use masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.