संग्राहक तलावाचा प्रश्न मार्गी लागणार!

By admin | Published: August 31, 2015 01:22 AM2015-08-31T01:22:08+5:302015-08-31T01:22:08+5:30

वैरागड संग्राहक तलावाचा प्रस्ताव पंधरा दिवसात सादर करण्याचे जलसंधारण राज्यमंत्र्यांचे आदेश.

The collector pond question will have to be resolved! | संग्राहक तलावाचा प्रश्न मार्गी लागणार!

संग्राहक तलावाचा प्रश्न मार्गी लागणार!

Next

चिखली (जि. बुलडाणा): मतदारसंघातील वैरागड संग्राहक तलावाचा प्रस्ताव पंधरा दिवसात शासनास सादर करा असे आदेश जलसंधारण राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांनी कार्यकारी अभियंता लघू सिंचन, बुलडाणा यांना दिले आहे. जिल्हय़ातील खडकपूर्णा व विविध जलसंधारणाच्या विषयावर राज्यमंत्री ना. शिवतारे यांनी २५ ऑगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीमध्ये आमदार राहुल बोंदे यांनी वारंवार केलेल्या वैरागड साठवण तलावाच्या पाठपुराव्याचा विषय प्रमुख्याने चर्चेत घेण्यात आला. राज्यपालांच्या आदेशानुसार २५0 हेक्टरपेक्षा जास्त क्षमतेचे प्रकल्प सुरू करण्यास मनाई करण्यात आलेली होती. त्यामुळे ११ जून रोजी संबंधित विभागाकडून वैरागड संग्राहक तलाव क्षमता २५0 हेक्टर करून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. वैरागड गावकरी व परिसरातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे, तरी वैरागड संग्राहक तलावाचे काम सुरू करण्याच्या मार्गातील अडचणी सोडविण्यासाठी आपल्या स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असे पत्र अधिवेशनादरम्यान आ. राहुल बोंद्रे यांनी ना. शिवतारेंना दिले होते. वैरागड संग्राहक साठवण तलावाचे सिंचन क्षेत्र २४७ हेक्टर असून, सुमारे १0 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. या संग्राहक साठवण तलावासाठी जलसंधारण महामंडळाऐवजी शासनाकडून प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी परिपूर्ण अंदाजपत्रक मुख्य अभियंता नागपूर यांच्या मार्फत शासनाकडे तातडीने सादर करावेत, असे आदेश ना. विजय शिवतारे यांनी लघुसिंचन कार्यकारी अभियंता देशमुख यांना दिले आहे.

Web Title: The collector pond question will have to be resolved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.