डाेणगाव काेराेना लसीकरणाची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:28 AM2021-01-09T04:28:57+5:302021-01-09T04:28:57+5:30
डोणगाव : काेराेना महामारीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात लवकरच लसीकरण माेहीम राबविण्यात येणार आहे. या माेहिमेची रंगीत तालीम डाेणगाव ...
डोणगाव : काेराेना महामारीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात लवकरच लसीकरण माेहीम राबविण्यात येणार आहे. या माेहिमेची रंगीत तालीम डाेणगाव येथील प्राथिमक आराेग्य केंद्रात ८ जानेवारी राेजी घेण्यात आली. या रंगीत तालमीला प्रभारी जिल्हाधिकारी प्रमाेदसिंह दुबे, उपविभागीय अधिकारी गणेश राठाेड व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. महेंद्र सरपाते उपस्थित हाेेते.
काेराेना संसर्गामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. काेराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लवकरच लसीकरण माेहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरणाची रंगीत तालीम ८ जानेवारी राेजी डोणगाव येथे घेण्यात आली. या रंगीत तालमीसाठी २५ लोकांची निवड करण्यात आली हाेती. त्यांना लसीकरणाची वेळ, ठिकाण याची माहिती देण्यात आली, तर लसीकरणास आलेल्यांची पोलीस विभागामार्फत प्रथम ओळख परेड होऊन नंतर प्रतीक्षा कक्षात बसविण्यात आले. त्यानंतर लसीकरण केंद्रात प्रतीकात्मक स्वरूपात ॲपच्या माध्यमाने नोंद घेण्यात आली व अर्धा तास निगराणी कक्षात आराम करण्यासाठी बसविण्यात आले.
प्रभारी जिल्हा अधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी लसीकरणाच्या रंगीत तालमीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय महसूल अधिकारी गणेश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते हजर होते. माेहिमेच्या तयारीसाठी डॉ. अमोल गवई, डॉ. किशोरकुमार बिबे, डॉ. सरदार डॉ. निमदेव, आरोग्य सहायक शिवशंकर बळी, एएसआय अशोक नरोटे, तलाठी शिवप्रसाद म्हस्के, तलाठी सुरेखा वाठोरे व पल्लवी गुंठेवार व ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल कर्मचारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशासेविका, अंगणवाडीसेविका, डॉ. संजय धाडकर आदींनी परिश्रम घेतले.
गावात येण्याचे साैभाग्य मिळाले
बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी म्हणून हा शेवटचा दौरा आहे. ताे स्वतःच्या गावात झाला. तोही कोरोनासारख्या महामारीला संपविण्यासाठी जीवनदायी असे लसीकरणाच्या रंगीत तालमीत मला माझ्या गावात येण्याचे सौभाग्य लाभले. हा दौरा प्रभारी जिल्हा अधिकारी म्हणून शेवटचाच ठरणार आहे, असे प्रमाेदसिंह दुबे यांनी यावेळी सांगितले.