लोणार सरोवरातील पाण्याचा रंग अद्यापही कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 11:19 AM2020-06-20T11:19:16+5:302020-06-20T11:55:29+5:30
लोणार सरोवरातील पाण्याची लालसर गुलाबी झटा अद्यापी कायम असल्याचे निदर्शनास येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : पाण्याचा रंग बदलल्यामुळे चर्चेत आलेल्या लोणार सरोवरातील पाण्याची लालसर गुलाबी झटा अद्यापी कायम असल्याचे निदर्शनास येत आहे.
गेल्या नऊ जून रोजी या सरोवरातील पाण्याचा रंग लालसर गुलाबी झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे वैज्ञानिकांसह सामान्य व्यक्ती सरोवराकडे आकर्षीत झाला होता. निरीच्या संशोधकांनीही येथील पाण्याचे नमुने गोळा केले होते तर खंडपीठात तातडीने सुनावणी होवून एक समितीही येथे विविध कामाच्या पाहणीसाठी आली होती.
दरम्यान, १९ जून रोजी पाण्याचा रंग बदलण्याच्या घटनेला दहा दिवस झाले. त्या पार्श्वभूमीवर अद्यापही येथे पर्यटक सरोवराचे हे बदललेले स्वरुप पाहण्यासाठी येत आहेत.
शुक्रवारी लोणार सरोवर परिसरात ढगांमुळे ऊन सावल्यांचा खेळ रंगला होता. त्यामुळे परिसरातील हिरवीगार झाडी आणि ऊन सावल्याच्या या खेळात सरोवर अधिकच खुलून दिसत होते. पर्यटकांनी त्याचा येथे मनसोक्त आनंद घेतला.
दरम्यान, निरी संस्था सरोवरातील पाण्याच्या या रंग बदलाचे नेमके काय कारण सांगते याकडे लक्ष लागून आहे. नाही म्हणायला येत्या २९ जून रोजी नागपूर खंडपीठात सरोवर संवर्धनाच्या निमित्ताने सुनावणी होणार आहेच.