जोडणारा धर्म,तोडणारा अधर्म- गोरे
By admin | Published: July 5, 2016 01:00 AM2016-07-05T01:00:53+5:302016-07-05T01:00:53+5:30
स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात गोरे यांचे प्रतिपादन.
हिवरा आश्रम (जि. बुलडाणा): स्वामी विवेकानंदांनी जगाला विश्वबंधूत्वाचा संदेश दिला आहे. जन्माने प्रत्येकाला एक धर्म मिळतो, असे असंख्य धर्म आज जगात आहेत. प्र त्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो व इतर धर्मियांबद्दल अनादर वाटतो. धर्मांमध्ये निर्माण झालेल्या भेदाच्या या भिंती माणसातील देवत्वाला संकुचित करीत आहेत. प्रत्येक धर्माचे नी तीतत्वे व जगण्याची प्रणाली भिन्न आहे. परंतु जात, धर्म, पंथ, परंपरा या पलीकडे जाऊन माणसाला जोडतो तो खरा धर्म असतो, असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी ४ जुलै रोजी स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. विवेकानंद कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर अखिल ग्राहक पंचायत अकोलाचे सुधाकर जकाते, पंचायतचे जिल्हा संघटन मंत्री श्रीराम ठोसर, आश्रमाचे सहसचिव विष्णूपंत कुलवंत, विश्वस्त अशोक गिर्हे, प्रवासी संघाचे अध्यक्ष आर.डी.आहिर हे होते. स्वामीजींनी दिलेला ह्यमानवसेवा हीच ईश्वर सेवाह्णङ्क हा मंत्र शुकदास महाराजांच्या जगण्याची दिशा ठरली असून, महाराजांनी आश्रमाच्या माध्यमातून सुरू केलेले मानवसेवा कार्य ही खरी परमेश्वर भक्ती आहे. माणसाला हृदयाशी धरणे, त्याला वेदनामुक्त करणे हे संतत्वाचे लक्षणे आहे, असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला.