दिलासादायक : बरे हाेण्याचे प्रमाण पाॅझिटिव्हच्या दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:35 AM2021-04-27T04:35:36+5:302021-04-27T04:35:36+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असताना साेमवारी पाॅझिटिव्हच्या दुप्पट रुग्णांनी काेराेनावर मात केल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळाले़ ...

Comfortable: The recovery rate is twice as positive | दिलासादायक : बरे हाेण्याचे प्रमाण पाॅझिटिव्हच्या दुप्पट

दिलासादायक : बरे हाेण्याचे प्रमाण पाॅझिटिव्हच्या दुप्पट

Next

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असताना साेमवारी पाॅझिटिव्हच्या दुप्पट रुग्णांनी काेराेनावर मात केल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळाले़ तब्बल १६०० जणांनी काेराेनावर मात केली असून ही आतापर्यंतची सर्वांत माेठी संख्या आहे़ साेमवारी आणखी आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ तसेच ९८३ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ २ हजार ७२६ जणांचा काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १०७, बुलडाणा तालुका चौथा ५, तांदुळवाडी ८, शिरपूर 3, सिंदखेड ३, हतेडी ३, मोताळा तालुका तळणी १, टाकळी १, खामगाव शहर ७४, खामगाव तालुका टेंभुर्णा ३, बोरी आडगाव २, किन्ही महादेव ३, कोलोरी ४, गारडगाव ३, शेगाव शहर ५९, शेगाव तालुका पहुरजिरा ३, जवळा ६, चिखली शहर ३६, चिखली तालुका चंदनपूर २, खंडाळा २, मेरा बु. ३, शेलगाव आटोळ ९ , दे. घुबे २, मलकापूर शहर ५०, मलकापूर तालुका विवरा ६, दे. राजा शहर ५६, दे. राजा तालुका : खैरव ६, अंढेरा २, सरंबा ४, दे. मही ३१, नारायणखेड ३, सिनगाव जहा १६, शिवणी आरमाळ ४, चिचखेड ७, पोखरी २, निमखेड ५, सिं. राजा शहर २५, सिं. राजा तालुका, पिंपळखुटा २, साखरखेर्डा २१, वाघोरा ६, बोराखेडी ६, शेंदुर्जन ३, दुसरबीड ३, कि. राजा ७, देवखेड २, मेहकर शहर १, विश्वी ३, संग्रामपूर शहर १, संग्रामपूर तालुका टुनकी १, पातुर्डा १, मराखेड १, वरवट बकाल ३

जळगाव जामोद शहर ९, जळगाव जामोद तालुका, पळशी सुपो ४, सूनगाव २, नांदुरा शहर १९, नांदुरा तालुका, निमगाव ६, वाडी ९, कोदरखेड ४, पलसोडा ३१, खातखेड ३, लोणार शहर १०, लोणार तालुका पिंपळनेर ४, भुमराळा २, धायफळ ३, सुलतानपूर येथील १० जणांचा समावेश आहे़ त्याचप्रमाणे उपचारादरम्यान बुलडाणा येथील ५४ वर्षीय पुरुष, राजेश्वर नगर बुलडाणा येथील ३१ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ५० वर्षीय पुरुष, किनगाव जटटू, ता. लोणार येथील ७० वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ५६ वर्षीय पुरुष, नागपूर येथील ७० वर्षीय पुरुष, हनुमाननगर, नांदुरा येथील ४७ वर्षीय पुरुष व छत्रपतीनगर बुलडाणा येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

६ हजार ६६६ जणांवर उपचार सुरू

आज रोजी ४ हजार ३५० नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ३ लाख ३८ हजार १०३ आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ६० हजार ६२ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ५३ हजार १५ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ६ हजार ६६६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ३८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: Comfortable: The recovery rate is twice as positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.