कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:01 AM2021-03-13T05:01:29+5:302021-03-13T05:01:29+5:30

येथील प्रा.आ.केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका कमल पद्मने यांना लस देऊन या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्षा ...

Commencement of corona preventive vaccination - A | कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात - A

कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात - A

Next

येथील प्रा.आ.केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका कमल पद्मने यांना लस देऊन या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, मेहकर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवानंद पवार, सरपंच विश्वनाथ हिवराळे, रुग्ण कल्याण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चव्हाण व डॉ. श्वेता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा तंत्रज्ञ रामेश्वर शिंगाडे, आरोग्य सहायक बबन काकडे, डी.एम. डाबेराव, आरोग्य साहायिका अरुणा दाभाडे, सुवर्णा बेलसरे, मनीषा जेऊघाले, औषध निर्माण अधिकारी योगीराज मिसाळ, आरोग्य सेवक शेख अतिक, नितीन गाढवे, परिचर राजू सुरजुसे आदी कर्मचाऱ्यांनी लसीकरणास संपूर्ण दिवसभर परिश्रम घेतले. गेल्या दोन आठवड्यात जानेफळ येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Commencement of corona preventive vaccination - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.