देऊळगाव कुंडपाळ येथे आराेग्य सर्वेक्षणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:33 AM2021-05-15T04:33:14+5:302021-05-15T04:33:14+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक जिल्हा परिषद शाळेमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नोडल ऑफिसर म्हणून मुख्याध्यापक ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक जिल्हा परिषद शाळेमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नोडल ऑफिसर म्हणून मुख्याध्यापक गो.मा. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ गावातील कोरोना विषाणू संदर्भात परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन व नियंत्रणाखाली गावामधील तीन वाॅर्डांत तीन पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत़ या पथकांद्वारे घरोघरी जाऊन आरोग्यविषयक माहिती तसेच इतर आजार याबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे़
सर्वेक्षणासाठी वाॅर्ड एकमध्ये शिल्पा राठोड, शीतल वायाळ, शालू राठोड, शिल्पा गायकवाड तर वाॅर्ड दोनमध्ये शिक्षक गणेश व्यवहारे, कुसुम इंगळे, मीना खरात आणि शोभा इंगळे तर वाॅर्ड तीनमध्ये शिक्षक माणिक बाजड,
कल्पना राठोड, कुसुम डोंगरे आणि उषा सरकटे हे सर्वेक्षण करत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखणे आणि बाधितांचा शोध घेणे, संबंधितांना विलीनीकरण कक्षात ठेवणे हा या सर्वेक्षणामागील हेतू आहे़ सर्वेक्षणासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.